धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात, जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका

धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात, जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. त्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांची पाठराखण करीत त्यांना राजीनामा देण्याची काही आवश्यकता नाही असे म्हटले आहे. आता भगवान गडाचे महंत नामदेव शास्री महाराज यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना प्रमाणपत्र दिले आहे. तसेच या प्रकरणात ज्यांनी संतोष देशमुख यांचा हत्या केली त्यांची मानसिक अवस्था देखील पाहावी अशी मागणी देखील नामदेव शास्री महाराज यांनी केली आहे. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली आहे.

मंत्री धनंजय मुंडे गेले दीड दोन महिन्यांपासून संतोष देखमुख यांची हत्या झाल्यानंतर चर्चेत आहेत. त्यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड याना अटक झाली आहे. या प्रकरणातील सर्व सहा आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. या प्रकरणात आता भगवान गडाचे महंत नामदेव शास्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांना फेटाळून लावत त्यांची बाजू घेतली आहे. मुंडे यांची ज्या प्रकारे मीडिया ट्रायल सुरु आहे, आणि ज्या प्रकारे त्यांनी संयमीपणा दाखविला आहे. तो पाहाता इतका संयमीपणा जर अध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी दाखविला असता तर ते संत पदावर पोहचले असते अशा आशयाचे विधान भगवान गडाचे महंत नामदेव शास्री महाराज यांनी केले आहे. यावर राष्ट्रवादी  काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपण संत नामदेव शास्री महाराजांबद्दल बोलण्याइतके मोठे नाही परंतू ते ज्या गादीचा वारसा चालवित आहेत, तिला थोर परंपरा आहे. त्याचा तरी त्यांना मान राखावा अशी अपेक्षा आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेचा विचार करा असे ते म्हणत आहेत. मग संतोष देखमुख यांची मुलं, ज्यांना आपल्या बापाचा चेहरा रोज दिसत आहे त्यांच्या मानसिकतेचा कोण विचार करणार असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

या प्रकरणात आधी वॉचमन अशोक सोनवणे यांचा खून झाला होता. त्याचा सुद्धा खून करण्याची गरज काय होती का? संतानी द्वेषापलिकडे जाऊन सर्वांना एकाच न्यायाने पाहिले पाहीजे. जर अशा प्रकारे आपण जर बदला घेऊ लागलो तर कायदा राहणार नाही. ‘डोळ्यांचा बदल्यात डोळा’ हा न्याय जर लावला तर गांधींच्या विचारांप्रमाणे संपूर्ण जग अंध होईल असेही जितेंद्र आव्हा़ड यावेळी म्हणाले. त्याच बीडमध्ये रामकृष्ण बांगर यांना खोट्या केसेमध्ये धनंजय मुंडे आणि कराड याने अडकवले आहे. पायात नेम थरून आरोपीनी गोळ्या घातली अशी केस एका म्हातारीवर बनविली आहे. मुळात म्हातारी व्यक्ती बंदूकीचा चाफ ओढू शकते का? ते झटका तिला सहन होईल का? आपण रोज पोलिसांशी या केसवर  बोलत आहोत तर पोलिस मला उत्तर देत आहेत की केस आज मागे घेतो उद्या मागे घेतो’ असेही आव्हाड यांनी सांगितले.

मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात

महंत म्हणतात की पंकजा मुंडे माझ्याकडे आल्या नव्हत्या म्हणून मी त्यांची बाजू घेतली नाही. कराड हा आरोपी आहे. तर धनंजय मुंडे हे मंत्री असल्याने आपण त्यांची बाजू घेतली असे त्यांचे म्हणणे आहे. संतांनी शेवटच्या माणसाचे ऐकले पाहीजे. मूळात ते ज्या गादीचा वारसा चालवित आहेत तिला मोठी परंपरा आहे. भगवान गडची जागा एका कासार समाजातील व्यक्तीची आहे. त्यानंतर भीमसेन महाराज आले, ते राजपूत समाजाचे होते. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते. बाबासाहेबांच्या मनमाड परिषदेत संत भीमसेन गुरुजी सामील झाले होते. त्यांना कुणाला त्या जागेवर बसवायच होतं आणि तिथे कोण मोटार सायकलवर येऊन बसलं हे सगळ्याना माहिती आहे. संत तुकाराम यांची कधी जात चर्चेत आली नाही. त्यांना अख्या महाराष्ट्राने संत पदी नेले होते. या गादीचा मान राखायला हवा. आता धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ग्रामीण भागात एसटी रुबाबात धावणार, नव्या गाड्यांच्या समावेशाने लांबपल्ल्याचा प्रवास सुखकर होणार ग्रामीण भागात एसटी रुबाबात धावणार, नव्या गाड्यांच्या समावेशाने लांबपल्ल्याचा प्रवास सुखकर होणार
एसटी महामंडळात स्वमालकीच्या २६४० बसेस टप्प्या टप्प्याने दाखल होत आहेत. पहिल्या टप्प्यातील ११० बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस अशोक...
खुशी कपूरच्या मिस्ट्री मॅनचा खुलासा?; कोण आहे अभिनेत्रीच्या स्वप्नांचा राजकुमार?
BMC Budget 2025 : महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये घट, प्रत्येक वर्षी 4500 कोटींचा तोटा; 4 फेब्रुवारीला सादर होणार BMC चं अर्थसंकल्प
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल – नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 8 नक्षलवाद्यांचा खात्मा
फक्त पोकळ घोषणा, मोठ्या वल्गना…शेतकरी, कृषीक्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काहीही नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
Crime News – मानवतेला काळीमा, मेव्हणीवर बलात्कार करून मृतदेह जाळला
Budget 2025 – निधीमध्ये कपात केल्याने महत्त्वाच्या क्षेत्रांना फटका; पी. चिदंबरम यांनी आकडेवारीतून केले स्पष्ट