Weightloss Drinks: झटपट वजन कमी करण्यासाठी सकाळी ‘या’ ड्रिंक्स करा ट्राय…

Weightloss Drinks: झटपट वजन कमी करण्यासाठी सकाळी ‘या’ ड्रिंक्स करा ट्राय…

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाच्या समस्या वाढल्या आहेत. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वजन वाढीच्या समस्या होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी अनेकजण खूप प्रयत्न करतात. वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये फायबर, प्रोटिन, हेल्दी फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स या पोषक घटकांचा समावश करा. वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध प्रकारचे डायटिंग केले जाते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम केले पाहिजेल.

वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारामध्ये हिरव्या भाज्या, डाळी, फळ आणि विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का तुम्ही सकाळी उठल्यावर नियमित काही विशेष पेयांचे आहारात समावेश केल्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते त्यासोबतच वजन कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी कोणते पेय उपयुक्त ठरू शकते.

लिंबू तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. लिंबामध्ये नैसर्गिक व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड असते ज्यामुळे तुमच्या शरीरामधील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. तुम्ही जर सकाळी उठल्यावर सकाळी उपाशी पोटी लिंबू पाण्याचे सेवन करू शकता. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील चयापचय वाढते आणि तुमच्या पोटाचा घेरा कमी होतो. अनेकजण वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पितात. सकाळी लिंबू पाणी पिणे फायदेशीर असते. लिंबू पाण्यामध्ये तुम्ही जर मध मिसळले तर त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. लिंबू पाण्यामध्ये मध मिसळल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि पोटा संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होतात. सकाळी उठल्यावर तुम्ही जिऱ्याचे पाणी प्यायाल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे तुम्हाला सारखी भूक लागत नाही ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते त्यासोबतच तुमची पचनक्रिया सुधारते. जिऱ्याचे पाणी तुमचं वजन कमी करण्यास मदत करते त्योसोबतच त्वचेचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. जिऱ्याचे पाणी सकाळी प्यायल्यामुळे तुमचं शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. दालचिनी वजन कमी करण्यासाठी भरपूर फायदेशीर ठरते. दालचिनीचे पाणी प्यायल्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. दालचिनीचे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील तणाव कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो :

  • वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश करावा.
  • वजन कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचे असते.
  • वजन कमी करताना जेवनामध्ये भाज्यांचे प्रमाण जास्त ठेवा.
  • सलाड वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
  • नियमित व्यायाम आणि योगा केल्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईतील ‘या’ पाच भागात 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, तुमच्या विभागात काय असणार स्थिती? मुंबईतील ‘या’ पाच भागात 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, तुमच्या विभागात काय असणार स्थिती?
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. मुंबईत 2400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी काही भागाचा...
Mahakumbh 2025 Stampede : सरकारने 18 तास सत्य लपवलं, 6 ठिकाणी झाली होती चेंगराचेंगरी, योगींनी राजीनामा द्यावा; शंकराचार्यांची यांची मागणी
Maghi Ganeshotsav – कणकवलीतील जामसंडेमध्ये माघी गणेश जयंती उत्सव, श्रींचे धुमधडाक्यात आगमन
Ranji Trophy 2025 – पुजारा-बदोनी-रहाणे ठरले Nervous Nineties चे शिकार, दोन फलंदाज 99 वरच बाद
Weightloss Drinks: झटपट वजन कमी करण्यासाठी सकाळी ‘या’ ड्रिंक्स करा ट्राय…
Elphinstone Bridge : ऐन परीक्षेच्या काळात एल्फिन्स्टन पूल पाडल्यास विद्यार्थ्यांची होणार गैरसोय, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र
Santosh Deshmukh Case : आमच्या कुटुंबाला धमकी वजा इशारा सोशल मीडियावर येतोय, धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांची घेतली भेट