व्यायाम आणि डायट फॉलो करूनही होत नाही वजन कमी? मग तुम्हीही करत असाल या चुका

व्यायाम आणि डायट फॉलो करूनही होत नाही वजन कमी? मग तुम्हीही करत असाल या चुका

आजच्या काळात तंदुरुस्त आणि निरोगी राहणे ही प्रत्येकाची प्राथमिकता आहे. वजन कमी करण्यासाठी लोक व्यायाम आणि निरोगी आहाराचा अवलंब करतात. परंतु अनेक वेळा असे घडते की कठोर परिश्रम करून आणि आहार योजनेचे पालन करून देखील वजनात कोणताही बदल दिसून येत नाही. ही परिस्थिती केवळ निराशा जनकच नाही तर कधी कधी आपला आत्मविश्वास गमवणारीही असते. जर तुम्हाला ही वजन वाढीच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर असे होऊ शकते की तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात काही चुका करत आहात ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसेल.

वजन कमी करण्यासाठी केवळ व्यायाम आणि आहार एवढेच पुरेसे नसते तर त्यामध्ये योग्य सवयींचा देखील समावेश असतो. आठ तासांची झोप आणि मानसिक शांती यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश असतो. आज जाणून घेऊ त्या सामान्य चुकांबद्दल जे वजन कमी करण्याची प्रक्रिया मंदावतात.

योग्य रित्या कॅलरी न मोजणे

वजन कमी करण्यासाठी आपण घेत असलेल्या कॅलरीस पेक्षा जास्त कॅलरी बर्न करणे महत्त्वाचे आहे. परंतु अनेक वेळा लोक कॅलरी मोजण्यातच चुका करतात किंवा आरोग्यदायी पदार्थांचे जास्त सेवन करतात त्यामुळे वजन कमी होत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या योग्य प्रमाणाकडे लक्ष द्या. कॅलरी मोजण्यासाठी ॲप्स किंवा डायरी वापरा. जेणेकरून तुम्ही योग्य प्रमाणात कॅलरीचे नियोजन करू शकतात.

प्रोटीनची कमी

वजन कमी करण्यात प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावतात. हे केवळ स्नायूंना बळकट करत नाही तर तुम्हाला दीर्घकाळ भूक लागण्यापासून थांबवतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. परंतु जर प्रोटीन ची कमतरता असेल तर तुमचे वजन कमी होण्याची प्रक्रिया मंदावते. शक्य असल्यास तुमच्या आहारात अंडी, कडधान्य, काजू आणि दही सारख्या प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश करा. यासोबतच दिवसाची सुरुवात प्रोटीन असलेल्या नाष्ट्याने करा.

दुपारच्या जेवणानंतर झोपणे

दुपारी जेवणानंतर झोपण्याच्या सवयीमुळे वजन वाढू शकते. बरेच लोक दुपारी जेवल्यानंतर झोपतात. जेवल्यानंतर आपले शरीर अन्न पचवण्याची आणि त्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू करते. या काळात तुम्ही लगेच झोपल्यास ही प्रक्रिया मंदावते आणि शरीरात चरबीच्या रूपात जास्त कॅलरीज जमा होऊ लागतात.

पाणी कमी पिणे

पाण्याच्या कमतरतेमुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया मंदावते. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील चयापचय क्रिया नीट होत नाही आणि भुकेचे भावनाही वाढू शकते. त्यामुळे दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. जेवण करण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा.

व्यायामात विविधतेचा अभाव

रोज त्याच प्रकारचा व्यायाम केल्याने शरीराला त्याची सवय होते. त्यामुळे कॅलरी बर्न करण्याची क्षमता कमी होते. तुमच्या वर्कआउट रुटीनमध्ये विविधता आणा. कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि योगासने एकत्रित करून व्यायाम करा.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Weightloss Drinks: झटपट वजन कमी करण्यासाठी सकाळी ‘या’ ड्रिंक्स करा ट्राय… Weightloss Drinks: झटपट वजन कमी करण्यासाठी सकाळी ‘या’ ड्रिंक्स करा ट्राय…
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाच्या समस्या वाढल्या आहेत. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वजन वाढीच्या समस्या...
Elphinstone Bridge : ऐन परीक्षेच्या काळात एल्फिन्स्टन पूल पाडल्यास विद्यार्थ्यांची होणार गैरसोय, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र
Santosh Deshmukh Case : आमच्या कुटुंबाला धमकी वजा इशारा सोशल मीडियावर येतोय, धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांची घेतली भेट
Jalna News – दरोडेखोरांचा गावठी पिस्तूलातून गोळीबार, छातीत गोळी लागल्याने युवक गंभीर जखमी
Dhirendra Shastri : चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांना मोक्ष प्राप्ती झाली, धीरेंद्र शास्त्रींचं वादग्रस्त वक्तव्य
ते उत्तम संगीतकार आहेत, पण गायक म्हणून…; सोनू निगम ए. आर रहमानबद्दल असं काही बोलला की चाहतेही झाले अवाक
U-19 Women’s T20 World Cup – हिंदुस्थानच्या युवती विजेतेपदाच्या एक पाऊल दुर, इंग्लंडला धुळ चारल्यानंतर आता लढत दक्षिण आफ्रिकेशी