Mahakumbh 2025 – चेंगराचेंगरीवरून सोशल मीडियावर संताप, प्रशासनाच्या कारभारावर आणि व्यवस्थेवर उपस्थित केले प्रश्न

Mahakumbh 2025 – चेंगराचेंगरीवरून सोशल मीडियावर संताप, प्रशासनाच्या कारभारावर आणि व्यवस्थेवर उपस्थित केले प्रश्न

Mahakumbh 2025 मध्ये बुधवारी चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देश-विदेशातील नागरिकांसह हिंदुस्थानातून मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविकांनी प्रयागराज गाठलेले आहे. बुधवारी पहाटे मौनी अमावास्येनिमित्त पवित्र गंगा स्थानासाठी प्रचंड गर्दी उसळली होती आणि त्याच दरम्यान ही चेंगराचेंगरी झाली. त्यात 10 भाविकांचा मृत्यू झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. आणि प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सोशल मीडियावर लोकांनी महाकुंभमेळ्यातील सुरक्षा व्यवस्थेवर व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण दिसत नसून धक्काबुकी होताना दिसत आहे. सोशल मीडियावर अनेक लोक भविष्यात अशाप्रकारच्या घटना होऊ नये यासाठी महाकुंभ मेळ्याची सुरक्षा व्यवस्था लष्कराकडे सोपविण्याची मागणी करत आहेत.

प्रशासनावर आरोप करताना लोकांचे म्हणणे आहे की, गर्दी आणि गोंधळात सर्वसामान्य भाविकांची झुंज सुरूच होती. अनेक युजर्सनी सरकारला प्रचारात व्यग्र, व्यवस्थेकडे दुर्लक्ष असे म्हटले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत आखाडा परिषदेच्या संत आणि भाविकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. भाविकांना चांगली सुरक्षा व्यवस्था दिली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, असे लोकांचे म्हणणे आहे. एका युजरने लिहीले की, ही घटना अत्यंत दुःखद आहे. महाकुंभात चेंगराचेंगरी झाल्याची बातमी आहे. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी ही विनंती. तर अन्य एका युजरने प्रशासन व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत सर्व पैसे जाहिराती आणि गोडी मीडियावर खर्च केले तर असे होणारच. मात्र सरकारने या यंत्रणेकडे लक्ष दिले नाही.

ए के स्टॅलिन नावाच्या युजरने लिहिले, आज कुणाचा मुलगा गेला, कुणाचा बाप, कुणाचा संसार उद्ध्वस्त झाला… ही केवळ बातमी नाही, तर कुणाचे संपूर्ण आयुष्य अपूर्ण बनले आहे. अकार्यक्षम प्रशासन पूर्णपणे अपयशी! व्हीआयपी संस्कृतीत तल्लीन झालेले अधिकारी केवळ विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत गुंतले होते. मात्र सर्वसामान्य भाविकांसाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. सरकारने कुंभमेळ्याचे आयोजन केवळ दिखाव्यासाठी केले होते का? त्या निष्पाप लोकांच्या जिवाची किंमत नव्हती का? ही दुर्घटना म्हणजे व्यवस्थेचा सर्वात मोठा पराभव आहे. देव त्या दिवंगत आत्म्याला शांती देवो… पण हा निष्काळजीपणा विसरता कामा नये, असे व्यक्त केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ईडीकडून आरएल ज्वेलर्सची 169 कोटींची मालमत्ता जप्त ईडीकडून आरएल ज्वेलर्सची 169 कोटींची मालमत्ता जप्त
जिल्ह्यासह नाशिकमधील मेसर्स राजमल लखीचंद ज्केलर्स प्रा. लि. कडील सुमारे 169 कोटी रुपये किमतीच्या असंख्य स्थाकर मालमत्ता ईडीने तात्पुरत्या स्करूपात...
रेसबाजांना पोलिसांचा दणका, 14 जणांविरोधात वांद्रे पोलिसांकडून गुन्हा; 52 मोटरसायकली जप्त
एलईडी वाहनातून केले जाणार रेबीज लसीकरण, प्रतिबंधासाठी जनजागृती   
मुंबई विभाग क्र. 2 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर
“मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा”, आरपीएफ जवानाची मनसे नेत्यासोबत मुजोरी
मुलीला 36 तास बेड्यांमध्ये ठेवलं, 7 दिवस झोपू दिलं नाही; अमेरिकेतून हिंदुस्थानात पाठवण्यात आलेल्या कुटुंबीयांची व्यथा
ठाकरे गटाला गळती का लागली? एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच सांगितलं मोठं कारण