Jalna crime news – अनैतिक संबंधाच्या संशयातून अंबडमध्ये तरुणाचा खून, एकाला अटक, तीन आरोपी फरार

Jalna crime news – अनैतिक संबंधाच्या संशयातून अंबडमध्ये तरुणाचा खून, एकाला अटक, तीन आरोपी फरार

जालना जिल्ह्यातील अंबड शहरामध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून एका तरुणाचा चाकूने वार करत खून करण्यात आला. कलिम शेख खाजा शेख (वय – 30) असे मृताचे नाव आहे. शनिवारी रात्री हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत, तर तीन जण फरार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाण मोहल्ला भागात राहणाऱ्या महिलेसोबत कलिम शेखचे अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती महिलेच्या पतीला मिळाली. यामुळे पतीसह त्याचे भाऊ आणि इतर नातेवाईक कलिमवर पाळत ठेऊन होते.

शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास कलिमला एकटा गाठत सरफराज फेरोज शेख आणि अन्य तिघांनी त्याच्यावर चाकूने वार केला. यात जखमी झालेल्या कलिमला जालन्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

वय झालं, लग्न जमेना, मुलगा दारू पिऊन आला अन् पित्यानं लोखंडी मुसळीचा टोला डोक्यात घातला; जाग्यावरच मृत्यू

दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सरफराज शेख यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस सिध्दार्थ बारवाल हे करीत असून एका आरोपींला ताब्यात घेतल्याचे समजते. तीन जण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement