सौंदर्यच ठरले शाप, दिग्दर्शक देत होते नकार; अभिनेत्रीने केला खुलासा
बॉलिवुड चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी अभिनय करता येणे खूप महत्वाचे आहे. यासाठी सेलिब्रिटी अभिनयाच्या अभ्यासापासून ते इतर गोष्टींपर्यंत सर्व काही करतात. पण सौंदर्य हे अभिनयापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. पूर्वीच्या काळात आणि आजही अभिनेत्रीसाठी सुंदर असणे अधिक महत्त्वाचे आहे. यासाठी त्या घरगुती उपचारांपासून ते शस्त्रक्रियेपर्यंतच्या मदत घेतात. पण बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये एक अशी अभिनेत्री आहे जिचे सौंदर्य तिच्यासाठी अडचणीचे कारण बनले होते आणि तिला त्यामुळे नकाराचा सामना देखील करावा लागला. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून दिया मिर्झा आहे.
अभिनेत्री दिया मिर्झाचे वडील हे जर्मन होते आणि आई बंगाली होती. दिया दिसायला सुंदर असून आजही अनेक चाहते तिच्या सौंदर्यावर वेडे होतात. दियाला बॉलीवुडमधील टॅलेंटेड अभिनेत्रींमधील एक मानले जाते. तिने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे, मात्र यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहचण्याची तिला नामी संधी होती. परंतु तिथपर्यंत मजल मारण्यात ती अपयशी ठरली.
एका मुलाखतीदरम्यान दीयाने या गोष्टींचा खुलासा केला आहे की, तिचे सौंदर्य तिच्यासाठी शाप ठरले. खूप सुंदर असल्यामुळे तिला अनेक नकारांना सामोरे जावे लागले. दिग्दर्शक तिला मुख्य भूमिकेसाठी बोलवायचे आणि नकार द्यायचे 2001 मध्ये या अभिनेत्रीचा आर माधवनसोबत ‘रहना है तेरे दिल में’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटात दोघांची जोडी लोकांच्या खुप पसंतीत पडली . यानंतर, दियाला अनेक चांगले चित्रपट करायचे होते, परंतु तिला तिच्या आवडीनुसार भूमिका मिळू शकल्या नाहीत. कारण ती इतकी सुंदर आहे की ती सर्व पात्रांमध्ये बसत नव्हती.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List