राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं, राजीनाम्याचा चेंडू अजित पवारांकडून धनंजय मुंडेंच्या कोर्टात
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी विरोधी पक्षातील नेते सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर महत्वाचं विधान केलं आहे. राजीनामा द्यायचा की नाही, हे स्वतः धनंजय मुंडे यांनी ठरवावं, असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले की, ”बीडला घडली, ती अतिशय निंदनीय आहे. माणुसकीला काळिमा फासणारी आहे. त्यामुळे त्यात जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा केली जाईल. कुणालाही सोडले जाणार नाही.” ते म्हणाले, ”आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीत देखील आरोपाची सुई तिथपर्यंत पोहोचली, तरच आपण त्याबद्दलची कारवाई करणार. तुम्ही प्रश्न विचारला की, तुमच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, तेव्हा तुम्ही स्वतःहून राजीनामा दिला. जो तो स्वतःचा निर्णय स्वतः घेतो.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List