IPL 2025 Schedule – मुंबईकरांनो लागा तयारीला, ‘या’ दिवशी वानखेडे स्टेडियमवर होणार चौकार आणि षटकारांची आतषबाजी

IPL 2025 Schedule – मुंबईकरांनो लागा तयारीला, ‘या’ दिवशी वानखेडे स्टेडियमवर होणार चौकार आणि षटकारांची आतषबाजी

आयपीएल 2025 चे संपूर्ण वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. आयपीएलचा पहिला सामना 22 मार्च रोजी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघामध्ये कोलकाता येथील इडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. तर मुंबईचा पहिला सामना 23 मार्च रोजी चेन्नईविरुद्ध चेन्नईच्या पी चिंदबरम स्टेडियमवर खेळला जाईल. आयपीएलच्या 18 व्या हंगामात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एकूण 7 सामने खेळवले जाणार आहेत.

आयपीएलच्या 18 व्या हंगामात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना 31 मार्च रोजी मुंबई आणि कोलकाता या संघामध्ये खेळला जाणार आहे. त्यानंतर 7 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स रजत पाटीदारच्या नेतृत्वात पहिल्यांदाच मैदानात उतरणाऱ्या बंगळुरूला भिडेल. त्यानंतर 17 एप्रिल रोजी मुंबईविरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 20 एप्रिल रोजी मुंबईविरुद्ध चेन्नई, 27 एप्रिल रोजी मुंबईविरुद्ध लखनऊ, 6 मे रोजी मुंबईविरुद्ध गुजरात आणि वानखेडे स्टेडियमवरील शेवटचा सामना 15 मे रोजी मुंबईविरुद्ध दिल्ली यांच्यामध्ये खेळवला जाईल.

IPL 2025 Schedule – आयपीएलचं बीगूल वाजलं, संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी आणि कुठे भीडणार तुमच्या आवडीचा संघ

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement