Mumbai fire news – मस्जिद बंदरमधील 11 मजली इमारतीला आग, दोन महिलांचा होरपळून मृत्यू
मुंबईतील मस्जिद बंदर भागामध्ये रविवारी सकाळच्या सुमारास एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली. इस्साजी मार्गावर असलेल्या Pann Ali Mansion नावाच्या 11 मजली इमारतीच्या तळ मजल्यावर पहाटे सुमारास आगीचा भडका उडाला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असून यात होरपळून आणि गुदरमरुन दोन महिलांचा मृत्यू झाला.
मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 6 वाजून 11 मिनिटांनी ही घटना घडली. मस्जिद बंदरमधील 11 मजली इमारतीच्या तळ मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
आग विझवण्यात आल्यानंतर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पॅसेजमध्ये दोन महिला बेशुद्धावस्थेत आढळल्या होत्या. त्यांचे हात आणि पाय आगीमध्ये होरपळले होते. धुरामुळे गुदमरून त्या बेशुद्ध झाल्या होत्या. सहाव्या आणि आठव्या मजल्यावरही एक-एक महिला बेशुद्धावस्थेत सापडली होती. तसेच आणखी काही जण यात जखमी झाले होते.
या सगळ्यांना उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी साजिया आलम शेख (वय – 30) आणि साबिला खातून शेख (वय – 42) या दोन महिलांचा मृत्यू झाला. तर शाह जिया शेख, आदिल राजा शेख, नकिस सुरती, सौदा आलम शेख, करीम शेख यांच्यावर जेजेमध्ये उपचार करण्यात आले. यापैकी तिघांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोघांवर उपचार सुरू आहेत.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List