पतंगाच्या मांजाने चिरला दुचाकीस्वाराचा गळा, वसईमधील धक्कादायक घटना
पंतगांच्या मांजाने एका दुचाकीस्वाराचा गळा चिरला आहे. वसईत ही धक्कादायक घटना घडली असून सुदैवाने या दुचाकीस्वाराचा जीव वाचला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळच्य़ा सुमारस ही घटना घडली. वसईच्या समर्थ रामदास नगर येथे राहणारे विक्रम डांगे हे आपल्या पत्नी मुलासह फिरण्यासाठी जात होते. यावेळी बाईकवरुन फिरण्यासाठी जात असताना पतंगाचा मांजा गळ्यात अडकला. दरम्यान पत्नीने वेळीच मांजा काढल्यामुळे अनर्थ टळला आहे. मात्र विक्रमच्या गळ्यावर खोल जखम झाली आहे. गळ्यावरील जखमी एवढी खोल होती की, त्यामुळे बराच रक्तस्त्राव झाला. यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या गळ्याला 9 टाके पडल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List