उत्तराखंडमध्ये गोळीबार, आजी- माजी आमदारांमधील वादाला हिंसक वळण

उत्तराखंडमध्ये गोळीबार, आजी- माजी आमदारांमधील वादाला हिंसक वळण

उत्तराखंडमध्ये माजी आमदार आणि विद्यमान आमदार यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. याच वादातून माजी आमदाराने विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर  गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून दोन्ही आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड विधानसभेचे भाजप नेते, माजी आमदार कुंवर प्रणव सिंग चॅम्पियन आणि रुडकी मतदारसंघातील अपक्ष आमदार उमेश कुमार यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर वाद सुरू होता. या वादात आमदारांसोबत त्यांचे सहकारी देखील सहभागी झाले होते. दरम्यान हा वाद इतका विकोपाला गेला की, माजी आमदार कुंवर प्रणव सिंग चॅम्पियन आपल्या समर्थकांसह विद्यमान आमदार उमेश कुमार यांच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी गोळीबार केला. तसेच, या कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली आहे. यावेळी आमदार उमेश कुमार कार्यालयात उपस्थित नव्हते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, माजी आमदार कुंवर प्रणव सिंग चॅम्पियन आणि विद्यमान आमदार उमेश कुमार या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रमेंद्र डोवाल यांनी दिली. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या समर्थकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असल्याचे डोवाल यांनी सांगितले.

माजी आमदार कुंवर प्रणव सिंग चॅम्पियन यांची फायरिंगमुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही वर्षांपूर्वीही त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यादरम्यान ते हातात शस्त्र आणि पिस्तुल घेऊन नाचताना दिसले. अशा कारणांमुळे त्यांनी आमदारकीही गमावली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाडेवाढीचा कंडक्टरच्या खिशांवर बोजा, महामंडळाचा उपाय म्हणजे आजार परवडला पण उपचार नको ! भाडेवाढीचा कंडक्टरच्या खिशांवर बोजा, महामंडळाचा उपाय म्हणजे आजार परवडला पण उपचार नको !
एसटी महामंडळाने २५ जानेवारी २०२५ पासून १५ टक्के भाडेवाढ केल्यानंतर गोंधळ उडाला आहे. ही भाडेवाढ करताना पाच रुपयांच्या पटीत न...
‘त्या’ कंपन्या धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढवणार? अंजली दमानियांनी अजितदादांकडे सादर केली बॅलेन्स शीट
अयोध्येत तुफान गर्दी, दोन भाविकांचा मृत्यू
Photo – पाहा जवानांच्या ‘बिटींग द रिट्रीट’च्या सरावाची ही सुंदर दृश्ये
कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार, हिंदुस्थान चीनमधील उच्चस्तरीय बैठकीत निर्णय
विराट कोहली 13 वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार, ऋषभ पंतला डच्चू; ‘या’ दिवसापासून सुरू होणार सामना
ईडीची मोठी कारवाई, शेरॉन बायो मेडिसिन लिमिटेडची 80 कोटींची संपत्ती जप्त