इंडिया आघाडीने नरेंद्र मोदींचं बहुमत संपवलं, आघाडीत संवादाची गरज; संजय राऊत यांचे मत

इंडिया आघाडीने नरेंद्र मोदींचं बहुमत संपवलं, आघाडीत संवादाची गरज; संजय राऊत यांचे मत

इंडिया आघाडीने नरेंद्र मोदींच बहुमत संपवलं असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच आघाडीत संवादाची गरज असे मतही संजय राऊत यांनी व्यक्त केले.

आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, गेल्या काही दिवसांत आमचे काही घटक पक्ष हे या भुमिकेत आहे की संवाद तुटला आहे. हा संवाद जर तुटला तर कोणतीही आघाडी यशस्वी होत नाही. शिवसेना भाजप युतीमध्ये संवाद संपल्याने युती तुटली होती. 2019 साली योग्य प्रकारे संवाद झाला नाही त्याचा परिणाम युती तुटण्यात झाला. इंडिया आघाडीत 30 पक्ष आहे, या 30 पक्षांसोबत संवाद ठेवण्यासाठी जबाबदार नेत्यांची नियुक्ती झाली पाहिजे. इंडिया आघाडीच्या बैठकीत माननीन उद्धव ठाकरे यांनी सतत सांगितले आहे. इतर प्रमुख नेत्यांनीही हा विषय मांडला आहे. पण एक मात्र सत्य आहे, जे ओमर अब्दुल्लाह आणि इतर नेत्यांनी सांगितले की ही आघाडी लोकसभा निवडणुकासाठी निर्माण झाली होती. हे जरी खरं असलं तरी देशाच्या राजकारणात इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी केली. नरेंद्र मोदींचं बहुमत संपवून टाकलं. म्हणून ही आघाडी टिकायला हवी. फक्त संसदेच नव्हे तर संसदेच्या बाहेरही आम्ही करायला पाहिजे. ज्या पद्धतीने हुकुमशाही डोकं वर काढत आहे. ती बाब चिंताजनक आहे. आघाडीतला मोठा पक्ष म्हणून काँग्रेस नेतृत्वाची आहे, ही जबाबदारी काँग्रेस पक्षानेच घेतली पाहिजे. आपापसांत निवडणूक लढणे चुकीचे नाही. दिल्लीत आप आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. तसं आम्ही म्हणालो की महानगर पालिकेत आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. पण हा वेगळा विचार करताना आपल्या एकेकाळच्या सहकाऱ्यावर किंवा भविष्यात लोकसभेला आपण पुन्हा एकत्र येणार असे चित्र असेल तर अगदी देशद्रोही ठरवण्या इतपत कुणीही आपल्या सहकाऱ्यांसोबत जाऊ नये ही शिवसेनेची आणि उद्धव ठाकरे यांची भुमिका आहे असे संजय राऊत म्हणाले.

तसेच देशापुढे सर्वात मोठे संकट हे मोदी आणि शहा आहेत. त्यांची हुकूमशाही आणि संविधानावर होणारे हल्ले हे मोठे संकट आहे. जर त्यांच्या विरोधात आम्हाला लढायचे आहे तर इंडिया आघाडीला आणखी मजबुतीने काम करण्याची गरज आहे अशी आमची भुमिका आहे असेही संजय राऊत यांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘बिग बॉस’चे विजेते आधीपासूनच ठरलेले असतात..; पूर्व विजेती शिल्पा शिंदे मोठा दावा ‘बिग बॉस’चे विजेते आधीपासूनच ठरलेले असतात..; पूर्व विजेती शिल्पा शिंदे मोठा दावा
‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले येत्या 19 जानेवारी रोजी पार पडणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात आठ स्पर्धक असून त्यांच्यामध्ये...
…तर माझं आयुष्य नरकचं बनलं असतं, रेखा – अमिताभ बच्चन यांच्या नात्यावर जया बच्चन यांची प्रतिक्रिया
बॉलीवूड स्टार्सच्या बॉडीगार्ड्सचे पगार असतात लाखोंच्या घरात? आलिया भट्टच्या बॉडीगार्डने थेट सांगितले आकडे
लग्न करून आयुष्य उद्ध्वस्त; ‘महाभारत’ फेम अभिनेत्याचा घटस्फोट, AI इंजीनिअर अतुल सुभाषशी केली तुलना
मणिपूरमध्ये सुरक्षा दल आणि पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जप्त केली शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा
आमच्या कुटुंबातील सदस्याचं बर वाईट झाल्यानंतर सरकार आम्हाला न्याय देणार का? वैभवी देशमुखचा सवाल
10 रुपयांसाठी बसमध्ये तुफान हाणामारी, कंडक्टर आणि निवृत्त IAS अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल