ईव्हीएम, चोरी, दरोडा यांच्या माध्यमातून भाजपला विरोधी पक्ष संपवायचा आहे; संजय राऊत यांचा घणाघात
भाजपला देशातून विरोधी पक्षांचं अस्तित्व संपवायचं आहे असा घणाघात संजय राऊत यांनी केला. तसेच ईव्हीएम, चोरी, दरोडा यांच्या माध्यमातून त्यांना विरोधी पक्ष संपवायचा आहे असेही संजय राऊत म्हणाले.
आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, भाजपला देशातून विरोधी पक्षांचं अस्तित्व संपवायचं आहे, हीच हुकुमशाही आहे. ईव्हीएएम, चोरी, दरोडा यांच्या माध्यमातून त्यांना विरोधी पक्ष संपवायचा आहे. पण विरोधी पक्ष संपणार नाही हा देश महान आहे.
तसेच भाजप महाराष्ट्रात निवडणुकीत कशी जिंकते हे जाणून घ्यायचं असेल तर अमित शहा यांना माझं आमंत्रण आहे की त्यांनी कोल्हापुरातल्या मारकडवाडीत जावं. तिथल्या लोकांशी चर्चा करावी आणि सांगावं की आम्ही खरंच जिंकलो आहोत. आणि कार्यकर्ते आणि विचारसरणीवर ही निवडणूक जिंकल्याचे शहा यांनी सांगावे असेही राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List