अमित शाह यांनी जवळ बोलावून खुर्चीवर बसवलं, कानात काय सांगितलं?; भुजबळ काय म्हणाले?
देशाचे गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग गावातील व्येंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पॉवर अँड एग्रो प्रोसेसिंग लिमिटेड आयोजित कार्यक्रमात अमित शाह हजर राहीले होते. त्यावेळी त्यांनी जोरदार भाषण करीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना आपल्या जवळ बोलावून घेतले आणि शेजारच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली. या घटनेनंतर राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.
या भेटीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रीया देताना सांगितले की अमित शाह यांनी स्वत: जवळ बोलावून खुर्चीवर बसवलं हा त्यांचा मोठेपणा आहे. यावेळी आमच्यात व्यंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पार्क बाबत चर्चा झाली आहे. अमित शाह मला म्हणत होते की तुम्ही भाषण करा. मग त्यांना मी सांगितलं की तुम्ही येण्याच्या अगोदरच माझे भाषण केले असे भुजबळ यांनी सांगितले. यावेळी राजकारणावर काही चर्चा झाली नाही. दिल्ली ही देशाची राजधानी तुम्ही आम्ही कधी पण जाऊ शकतो असेही भुजबळ यांनी सांगितले. छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत नाराज असल्याने या भेटीकडे राजकीय अंगाने पाहीले जात आहे.
जेव्हा जवान आणि किसान यांचे हात एकत्रित अशा कामाला लागतात तेव्हा काय घडू शकते हे आपण पाहतो आहोत. साधारण 1500 गीर गायी या ठिकाणी आहेत. गाईच्या दूधापासून ते शेण, गोमूत्र यांचा देखील येथे वस्तू आणि औषधांसाठी उपयोग केला जात आहे. सुगंधी वनस्पतींपासून पर्फ्युम तयार केले जात आहेत. सेंद्रिय खत देखील याठिकाणी तयार केली जात आहेत. घरात वापरले जाणारे पेंट देखील याठिकाणी तयार केले जात आहे. पण वापरतो त्या पेंटमुळे त्रास होतो. मात्र हा पेंट नैसर्गिक असल्यामुळे कोणताही त्रास होत नाही. जवान आणि किसान दोघेही मेहनत घेत आहेत. जवान सीमांवर रक्षणासाठी तैनात असतात. तर येथे सेवा मुक्त झाल्यानंतर अनेक सैनिक या पवित्र कामात लागले आहेत असे माजी मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
अत्यंत कमी किमतीमध्ये उत्कृष्ट वस्तू तयार करण्याचे काम हे निवृत्त सैनिक करत आहेत. हे सगळं होऊ शकतं, मात्र यासाठी दृष्टिकोन आवश्यक आहे. 5 वर्षांपूर्वी कोणी असं होईल म्हणाले असते तर विश्वास बसला नसता. मात्र हा आविष्कार आहे, अजुबा आहे. शिवाजीराव डोळे यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे लोक काम करत आहेत. आपल्या देशात जमीन खूप आहे, मात्र या जमिनीतून सोने उगवण्याचा प्रयत्न करायला हवा. मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती असं गाणं आहे. इथे आल्यावर या गीताची अनुभूती येते असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण होईल
एखादी कमिटी तयार केली तरी वर्षभरात किती भांडण होतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली. आपल्या शिवाजी रावांनी त्यांचे नाव सार्थकी लावले आहे. सुराज्य काय असते ते इथे येऊन पाहा. असेच काम सर्वत्र झाल्यास ग्राम स्वराज्य हे महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण होईल. संपूर्ण भारतात याचा प्रचार झाला पाहिजे. त्यांच्या लोकप्रियतेचे पंतप्रधान मोदी यांनी याचे कौतुक केले आहे. आज अमित शहा देखील येत आहेत. त्यांचे इथे येणे आणि तुम्हाला शुभेच्छा देणे हे खूप महत्त्वाचे आहे. अमित शहा इथे येऊन हे सर्व काम पाहातील, माहिती घेतील आणि तुमच्याशी बोलतील. तुमच्या या कामाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List