रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू, डोळ्यातील आसू… उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू, डोळ्यातील आसू… उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून सातत्याने दरे गावात जात आहेत. यावरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे. आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना जबरदस्त टोला लगावला. ते मुंबईतील अंधेरीत आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या भाजपचं वेगळं असतं. बाहेरच्या राज्यातून ९० हजार आणले. काही म्हणतात ते संघाचे लोक होते. आता ते ९० हजार कुठे गेले. ते संघाचे कार्यकर्ते असतील तर आता धावून येतील? मुलांना शाळेत प्रवेश हवा, रक्त हवे हे आरएसएसवाले देतील. ९० हजार जे उपरे आले ते रक्तदान करेल की गोमूत्र दान करेल. ते करू शकतात. शिवसैनिक अस्वस्थ रुग्णाला जातपात न पाहता रक्तदान करतील. पण संघाचे लोक असीतल तर म्हणतील रक्त नव्हे आम्ही गोमूत्र देतो. मद्रास आयआयटीचे संचालक कामकोटी म्हणाले, तापाने फणफणत होते तेव्हा गोमूत्र पिऊन बरे झाले. धन्य आहेत. अशी माणसं शिकतात कशी. शिकतात काय, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

एवढे मुंबईकर निष्ठूर होऊ शकत नाही. मावळा कधीच शिवसेनेशी गद्दारी करू शकत नाही. दरवेळी आपण शहरात सभा घेतो. यावेळी उपनगरमध्ये घेतली. येण्याजाण्याची गैरसोय होते. अडचणीची जागा असून सर्व निष्ठांवत आले. तुम्हाला धन्यवाद देतो. मी तुमच्या ताकदीवरच लढत आहे. वांद्र्यात गद्दाराचा मेळावा सुरू आहे. राजकारणातील बाटगे आहेत. गद्दारांना सांगतो तुम्ही करता काय. आज कदाचित तुम्ही जिंकला असं वाटत असेल. आज आम्ही हरलोत तरी जनता आमचं स्वागत करत आहे. गद्दार जिंकले असतील त्यांना जिंकवणारे अमित शाह आहे. यंत्रणा बेकायदेशीर वापरल्या. अमित शाह आहेत तोपर्यंत तुम्ही आहात. महापालिका होऊ द्या, तुमची काय वाट लागते ते पाहा. अडीच वर्ष तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून वागणूक मिळत होती. आता बसायचे तर बसा नाही तर गावाला निघून जा. मंत्रीपद नाही मिळालं गेले गावी. दावोसला नेले नाही, गेले गावी. रुसू बाई रुसू, गावात जाऊन बसू. डोळ्यातूल आसू दिसू लागलेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

विधानसभेत आपण गाफिल राहिलो. त्याचा गैरफायदा त्यांनी घेतला. त्या काळात त्यांना अपप्रचार केला. आपण हिंदुत्व सोडलं नाही. मला सांगा हिंदुत्व सोडलं असेल तर. मी चेंबूरच्या चिता कॅम्पमध्ये भाषण केलं. तिथे मुस्लिम होते. मी हिंदीत भाषण केलं. त्यांना म्हटलं मी हिंदुत्व सोडलं का. माझं हिंदुत्व मान्य आहे का. तर ते हो म्हणाले, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अहो.., मुख्यमंत्री साहेब! आमच्या भावना समजून घ्याल का? एमपीएससी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद अहो.., मुख्यमंत्री साहेब! आमच्या भावना समजून घ्याल का? एमपीएससी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद
राज्यसेवा मुख्य परीक्षा यावर्षी पासून चंद्रकांत दळवी समितीच्या शिफारसीनुसार, वर्णनात्मक पॅटर्न अभ्यासक्रम हा यूपीएससी परीक्षेची कॉपी व महाराष्ट्राच्या संदर्भासह आहे....
“आपल्याला कोणी गॉडफादर नाही, फक्त या तीन गोष्टीच…”  एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
हिंमत असेल तर तुमच्या झेंड्यातील हिरवा काढून दाखवा, उद्धव ठाकरे यांचे थेट चॅलेंज
मुंबई दंगल प्रकरण : माफी मी नाही अटलजींनी मागितली होती – उद्धव ठाकरे
मराठी माणसाच्या नादी लागू नका, जिथे औरंजेबाला झुकवलं तिथे अमित शहा किस झाड की पत्ती; उद्धव ठाकरे यांचा वज्राघात
बाळासाहेबांना अटक, अडवाणींनी फौज पाठवली… उद्धव ठाकरेंनी सर्वच काढलं
‘जय श्रीराम’नंतर ‘जय शिवराय’ म्हटलंच पाहिजे; उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले