जिनके इरादे बुलंद होते है, वही चट्टानों को गिराते है, काय म्हणाले एकनाथ शिंदे
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बीकेसीच्या मैदानावर शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले आहे. ते म्हणाले मला मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षे मिळाली. त्याचा आपण पुरेपूर जनतेसाठी काम करण्यात घालविली.आपण पायला भिंगरी लावून काम करीत राहीलो. आम्ही अडीच वर्षे काम केली त्याचे फळ म्हणजे आम्हाला विधानसभेत मिळालेला महाविजय आहे असे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला संधी मिळाली त्याचं आपण लाभ उठवित दुप्पट चौप्पट काम आम्ही केली आहे. माझ्या सोबत तुम्ही देखील काम केले आहे. आपण पायला भिंगरी लावून रात्रीचा दिवस करुन काम केले आहे. त्यामुळे आपल्याला हा महाविजय मिळाला आहे. हा लँड स्लाईड मँडेड विजय मिळविला आहे. आतापर्यंत इतिहासात इतका महाविजय मिळाला नाही असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
आपल्याला मिळालेल्या महाविजयामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. आपल्याला चौपट वेगाने काम करावं लागणार आहे. त्यासाठी अहोरात्र काम करायला मी तयार आहे. हा भगवा डौलाने फडकवत ठेवेल हा शब्द देतो असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. आपण बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा करणार नाही हे सांगतो. या शरीरातील रक्ताच्या प्रत्येक थेंबावर मायबाप जनतेचा हक्क आहे. तोच हक्क कायम राहील. हे वचन देतो असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
दोन कोटी ४० लाख बहिणींचा सख्खा भाऊ
मी साधा कार्यकर्ता आहे. कालही होतो, आजही आहे आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणून काम करतो. खुर्चीसाठी एकनाथ शिंदे कधीच कासावीस झाला नाही आणि होणार नाही. आई भवानीच्या आशीर्वादाने सर्व काही मिळालं आहे. मला मुख्यमंत्रीपद मिळाले. जनतेची सेवा करता आली. जनतेच्या आयुष्यात बदल घडवता आला. त्यांचं जीवन सुखी करण्याची संधी मला मिळाली. राज्यातील बहिणींचा दोन कोटी ४० लाख बहिणींचा सख्खा भाऊ,लाडका भाऊ म्हणून अशी आपल्याला ओळख मिळाली. ही पदापेक्षा मोठी आहे. खुर्चीची लालसा कुणाला आहे? आपल्याला कधीच नव्हती असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
जिनके इरादे बुलंद होते है, वही चट्टानों को गिराते है
और जो तुफानों में पलते है, वही दुनिया बदलते है…
आम्ही उठाव केला. कारण कोणत्याही म्हणून कोणत्याही खुर्चीपेक्षा आपल्याला स्वाभिमान महत्त्वाचा आहे. बाळासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला आहे. अडीच वर्षात मी किती वर्षाचे काम केले त्याचे मोजमाप तुम्ही करा असे आवाहन यावेळी एकनाथ शिंदे यांनी केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List