गोड बोलून सही करून घेतली अन्… जवळच्या व्यक्तीनेच केला घात; अभिनेत्रीचे लाखो रुपये घेऊन फरार

गोड बोलून सही करून घेतली अन्… जवळच्या व्यक्तीनेच केला घात; अभिनेत्रीचे लाखो रुपये घेऊन फरार

बॉलिवूडमधील अभिनेत्री असूदेत किंवा छोट्या पडद्यावरील अभिनेत्री असो. सुरुवातीला प्रत्येकीला कोणत्या ना कोणत्या अडचणींचा आणि फसवणूकीचा सामना करावा लागला आहे. अशीच एक छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जिने आपल्या कष्टाच्या जोरावर यश आणि पैसा कमावला पण एका व्यक्तीवर विश्वास ठेवणं तिला महागात पडलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी.

दिव्यांकानं विश्वास ठेवणं पडलं महाग 

दिव्यांकानं आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनयाच्या जोरावर तिनं प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. मालिकांनंतर आता दिव्यांकानं ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील नशिब आजमावलं आहे. मात्र एका व्यक्तीवर विश्वास ठेवणं तिला महाग पडलं आहे. त्याविषयी तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

गोड बोलून विश्वास जिंकला 

दिव्यांकानं तिच्यासोबत झालेल्या एका स्कॅमविषयी खुलासा केला.तिच्या एका विश्वासू चार्टेड अकाऊंटंट तब्बल लाखो रुपये घेऊन तो पळून गेला. त्यानंतर दिव्यांकानं त्याला कसं बसं शोधून काढलं. पण त्यामुळे तिला तिचे पैसे परत मिळाले असं नाही. दिव्यांका त्रिपाठीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं की, ‘बनूं मैं तेरी दुल्हन ही माझी पहिली मालिका होती. त्याच्या सेटवर एक CA होते. ते आमच्या सेटवरील इतर अभिनेत्रींचं अकाऊंट सांभाळायचे. महत्त्वाचं म्हणजे हा त्या काळातील एक स्कॅम होता आणि तो माझ्यासोबत झाला. दोनवर्ष त्यानं माझं अकाऊंट व्यवस्थित सांभाळलं. त्यावेळी मी 20-20, 24-24 तास काम करायचे. तर माझ्याकडे वेळ देखील नव्हता की मी कोणत्या CA कडे जाऊन त्यांच्याकडे सगळी विचारपूस करू. आता हा CA दुसऱ्या शहरातून यायचा. त्यांनी मला काही FD मध्ये काही पैसे टाकण्यास सांगितले, तो म्हणाला की तू कुठे खर्च देखील करत नाहीस. तुमच्या टॅक्सचं कसं काय होणार. महत्त्वाचं म्हणजे खर्च होत नव्हता कारण खर्च करण्यासाठी वेळ हवा जो नव्हता. त्यावेळी तर ऑनलाइन असा काही प्रकार देखील नव्हता. तर त्यामुळे त्याच 2-3 कपड्यांनी माझे दिवस जात होते. कारण सेटवर जाऊन त्यांचेच कपडे परिधान करायचो.’ अशा पद्धतीने त्या CA नं तिचा विश्वास जिंकला होता

तब्बल 12  लाखांचा गंडा घातला

दिव्यांकानं पुढे सांगितलं की, ‘तर त्यानं माझे काही FD बनवले. मी चार चेक साइन केले, एक बॅंकेच्या नावावर. तर काही फॉर्म्स भरले, ज्यात वरती माझंच नाव होतं आणि खाली माझं नावं होतं. बाकी पानं खाली होती. त्यांनी सांगितलं की इतर मी भरेन. तुम्ही चिंता करु नका. दोन-तीन ठिकाणी तुमचं नाव भरा.मी सही केली आणि त्यानंतर ती व्यक्ती गायब झाली. 12 लाख रुपये होते. त्यावेळी तर मी खूप कमी कमवायचे. जे काही कमावलं होतं ते 2 वर्षात त्यातही 12 लाख रुपये. ती व्यक्ती हे सगळे पैसे घेऊन पळाली. त्यानंतर मी त्याला फोन करत राहिले.’ अशा पद्धतीने त्या CAनं तब्बल 12 लाख रुपयांचा गंडा घातला.

पैशांसाठी छोट्या-छोट्या जाहिराती कराव्या लागल्या 

पुढे त्याच्याविषयी सांगताना दिव्यांका म्हणाली, ‘कसं तरी एका मित्राला त्याच्या शहरात पाठवलं आणि कसे बसे हूल-पट्टी दाखवत त्याच्याकडून 4 चेक काढून घेतले. पण त्यातले 3 चेक हे बाउंस झाले आणि फक्त एक चेक उरला. 9 लाख रुपयांचं माझं नुकसान झालं. मी त्याच्या विरोधात चेक बाउंसिंगची तक्रार दाखल केली. पण त्या प्रकरणावर एकानंतर एक अशी कोर्ट तारिख देत राहिलं. माझे वडील भोपाळवरून आले की आपण त्याच्याविरोधात केस लढूया कारण मला त्यासाठी कामातून वेळ मिळत नव्हता. पण जो वकील होता तोपण त्याच्या बाजून गेला. कारण त्यानं मला सांगितलं की सगळी कागदपत्र ही गायब झाली आहेत. त्यानं एक दिवस अचानक फोन केला आणि सांगितलं की मॅडम तुमच्या सगळ्या फाइल या गायब झाल्या आहेत. काही शिल्लक राहिलंच नाही. त्यानंतर आम्ही हार मानली. जेव्हा शो बंद झाला तेव्हा असं वाटलं की बरं झालं असतं जर माझ्याकडे ते पैसे राहिले असते. त्यानंतर मला पैशांसाठी छोट्या-छोट्या जाहिराती देखील कराव्या लागल्या.’

अशा पद्धतीने त्या CAनं अभिनेत्रीचा विश्वास जिंकून सगळे पैसे लंपास करून मोठा विश्वासघात केला. दरम्यान त्यानंतर दिव्यांकानं हिंदी मालिकांमधून पुन्हा आपलं यश मिळवलं. अगदी धीराने उभी राहिली. सोशल मीडियावर तिचे प्रचंड फॉलोवर्स आहेत.

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणात सुरेश धस यांचे गंभीर आरोप, पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर… महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणात सुरेश धस यांचे गंभीर आरोप, पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर…
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेमुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे....
घरातील कार्यक्रमात दारू पिऊन धिंगाणा घातल्याने भावानेच दिली भावाच्या हत्येची सुपारी
Delhi Assembly election – अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारसमोर मांडल्या ‘या’ 7 मागण्या, वाचा सविस्तर…
Jalgaon Tragedy – मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून मारल्या उड्या; ११ जण ठार
गोड बोलून सही करून घेतली अन्… जवळच्या व्यक्तीनेच केला घात; अभिनेत्रीचे लाखो रुपये घेऊन फरार
डिस्चार्जनंतरही सैफ अली खानला ‘ही’ तीन कामे करता येणार नाहीत; डॉक्टरांनी केलीये सक्त मनाई