डिस्चार्जनंतरही सैफ अली खानला ‘ही’ तीन कामे करता येणार नाहीत; डॉक्टरांनी केलीये सक्त मनाई
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. या हल्ल्यात सैफला 6 जखमा झाल्या होत्या.या हल्ल्यात सैफला 6 जखमा झाल्या होत्या. सैफ अली खान याच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर चोराकडून वार करण्यात आले. यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्याच्यावर लिलावती रूग्णालयात शस्त्रक्रियाही झाली. यातून तो आता बरा झाला असून त्याला डिस्चार्जही देण्याता आला आहे.
सैफला डॉक्टरांनी काय सल्ला दिला?
डॉक्टरांनी 6 तासांच ऑपरेशन करुन त्याचा मानेतून चाकूचा एक तुकडा काढला. ऑपरेशननंतर जेव्हा सैफ अली खान शुद्धीवर आला तेव्हा डॉक्टरांना त्याने दोन प्रश्न विचारले होते.
सैफने डॉक्टरला विचारलं की, तो शूट करू शकेल का? यानंतर त्याने विचारलं की त्याला जिममध्ये जाण्यात काही अडचण येणार नाही ना? यावर डॉक्टरांनी त्याला या गोष्टी करता येतील असं सांगितलं. पण जखमा बऱ्या होईपर्यंत त्याला आराम करण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला.
रुग्णालयातून बाहेर येताना एखाद्या हिरोसारखी झलक
आता सैफ अली खानच्या प्रकृतीचा अंदाज घेत डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला आहे. मात्र त्याला काही गोष्टींची काळजी घेण्यास सांगितलं आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ जेव्हा रुग्णालयातून बाहेर आला तेव्हा एखाद्या हिरोसारखीच झलक त्याची पाहायला मिळाली.
हल्ल्या झाल्यानंतर पाच दिवसानंतर आज पहिल्यांदाच सैफ अली खान कॅमेऱ्यासमोर आला. यावेळी त्याने पांढरा शर्ट, निळी डेनिम आणि काळा चष्मा घातला होता. त्याला एकदा सुखरुप पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला.
डिस्चार्ज दिला मात्र ही 3 कामे करण्यास सक्त मनाई
डिस्चार्जवेळी जरी तो फिट आणि फाइन दिसत असला किंवा त्याची प्रकृती नीट दिसत असली तरीही त्याला झालेल्या जखमा या अजूनही ताज्या आहेत त्यामुळे त्याला डॉक्टरांनी काही गोष्टी करण्यास सक्त मनाई केली आहे. या जखमा भरून निघण्यासाठी त्याला काही दिवस नक्कीच लागणार आहेत. तसेच शस्त्रक्रिया झालेली जागाही तशी ओलीच आहे. त्यामुळे त्यावर ताम येणार नाही याची काळजी घेण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे.
सैफला त्याच्या आवडीची ही कामे करता येणार नाही
त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी सैफ अली खानला एक महिना आराम करायला सांगितला आहे. तसंच पुढचे काही दिवस जीममध्ये व्यायाम करायला मनाई केली आहे. यासह प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत त्याला चित्रपटांच्या शूटिंगसाठीही जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
तसंच डॉक्टरांनी सैफला कोणतीही जड वस्तू उचलता येणार नाही असही सांगितलं आहे. त्यामुळे पुढील काही दिवस किंवा महिने सैफला या तीन गोष्टी करण्यास डॉक्टरांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे सैफला जीम आणि शुटींग या त्याच्या आवडत्या गोष्टींपासून काही दिवस तरी लांब राहावं लागणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List