बर्ड फ्ल्यूचा कहर, चिकन खावे की खाऊ नये ?,प्रशासनाने काय केले आवाहन पाहा

बर्ड फ्ल्यूचा कहर, चिकन खावे की खाऊ नये ?,प्रशासनाने काय केले आवाहन पाहा

उरण तालुक्यातील चिरनेर येथील बर्डफ्ल्यूचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे रायगड जिल्हाधिकाऱ्यांन पोल्ट्री फॉर्ममधील मृत कोंबड्याचे नमूने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चिरनेर येथील कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या कोंबड्या मृत झाल्यानंतर शासनाने एक किलोमीटर परिसरातील १,२३७ कोंबड्या आणि अंडी नष्ट केल्या आहेत,तर दहा किलोमीटर परिसरातील कोंबड्यांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. प्रशासनाने आता नागरिकांना आवाहन केले आहे.

तालुक्यातील चिरनेर येथील बर्डफ्ल्यू रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी कोंबड्यांना मारण्याचे आदेश रविवारपासून दिले होते. आतापर्यंत एक किलोमीटर परिसरातील १,२३७ कोंबड्या आणि अंडी नष्ट केल्या आहेत. तसेच १० किलोमीटरपर्यंत परिसरातील सर्वेक्षण केले जात आहे. चिरनेरमध्ये  काही कोंबड्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या पक्षांचे नमुने आम्ही पुणे आणि भोपाल ला पाठवले होते. भोपाळच्या प्रयोग शाळेने दिलेल्या अहवालात या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा सिद्ध झाले आहे.

नागरिकांनी काय करावे ?

चिरनेरमधील १ किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच आजूबाजूचा 10 किलोमीटरचा परिसराचे आम्ही सर्वेक्षण करीत आहोत असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे. आम्ही ज्या कोंबड्या नष्ट केलेल्या आहेत, त्यांचे पंचनामे देखील केलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी बर्ड फ्ल्यूला घाबरू नये, चिकन खाताना चांगले शिजवून आणि स्वच्छ करून खावे असे आवाहन नागरिकांना केले आहे.

नुकसान भरपाईची मागणी

बर्ड फ्ल्यूने आमचे खुप नुकसान होते आहे. कारण सध्या बर्ड फ्लूची साथ आल्याने चिरनेरमध्ये आमच्याकडे कोंबड्या नाहीत. आमचं घर चालणार कसं ? आमची मुले कशी शिकणार ? सरकारने या आजारावर काही प्रतिबंधक उपचार शोधून काढावा आणि नष्ट केलेल्या कोंबड्यांची भरपाई देण्यात यावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे असे एका चिकन विक्रेत्याने सांगितले.

ब्लड फ्लूमुळे चिरनेर गावात भीतीचे वातावरण आहे. आम्ही आता चिकन ऐवजी मासे खाणार आहोत. मात्र आम्हाला चिकन आवडायचे. मात्र आता नाईलाजाने आम्ही आता मच्छीकडे वळत आहोत. आमच्या घरी देखील कोंबड्या होत्या त्या देखील नष्ट केल्या आहेत. सरकारने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, चिरनेर येथील नागरिकांचा चिकन खाण्याऐवजी आता मासळीकडे कल गेलेला दिसून येत आहे. त्यामुळे मासे खूप महाग झालेले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून मारल्या उड्या; ११  जण ठार Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून मारल्या उड्या; ११ जण ठार
जळगावच्या पाचोरा जवळील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ अत्यंत मोठी दुर्घटना घडली आहे. एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या....
गोड बोलून सही करून घेतली अन्… जवळच्या व्यक्तीनेच केला घात; अभिनेत्रीचे लाखो रुपये घेऊन फरार
डिस्चार्जनंतरही सैफ अली खानला ‘ही’ तीन कामे करता येणार नाहीत; डॉक्टरांनी केलीये सक्त मनाई
Jalgaon Train Accident – जळगाव येथील अपघात दुर्दैवी, आदित्य ठाकरे यांची मृतांना श्रद्धांजली
20 दिवसात 93 गुन्हे, 138 बांगलादेशींची मुंबई पोलिसांकडून धरपकड; तिघांना मायदेशी हाकलले
अखेर केंद्रीय गृहमंत्रालयाला जाग; बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई करण्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना आदेश
Video हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा… दमदार डायलॉग, भव्य सेट… पाहा ‘छावा’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर