Bigg Boss 18 फिनालेमध्ये पोहोचण्यासाठी ‘या’ स्पर्धकाने निर्मात्याला दिली मोठी रक्कम? नक्की काय आहे सत्य
Bigg Boss 18: ‘बिग बॉस 18’ चा ग्रँड फिनाले रविवारी म्हणजे आज 19 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. स्पर्धकांसोबत चाहते देखील फिनालेसाठी उत्सुक आहेत. पण ‘बिग बॉस’च्या घरात सतत भांडणं आणि वाद स्पर्धकांमध्ये होत असल्याचं चित्र दिसून येतं. शिवाय स्पर्धकांवर अनेक आरोप देखील केले जातात. दरम्यान, ईशा सिंग हिच्यावर देखील आरोप होत आहेत. असा दावा केला जात आहे की, फिनालेमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करण्यासाठी ईशाने हिने 30 टक्के रक्कम मोजली आहे. यावर ईशाच्या टीमने आणि कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ईशा सिंग हिच्या कुटुंबियांनी अधिकृत वक्तव्य केलं आहे. ‘आम्ही ईशाची टीम आणि कुटुंबाच्या वतीने बोलत आहोत. ईशाने फिनालेमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करण्यासाठी स्वतःच्या कमातील 30 टक्के भाग निर्मात्यांना दिला आहे… करण्यात येत असलेल्या दाव्यात काहीही तथ्य नाही.’
‘एखाद्या कलाकारावर असे आरोप करण निराधार आहे. ईशा गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या करीयरसाठी मेहनत घेत आहे. त्यामुळे तिच्यावर असे आरोप होणं फार अपमानजनक आहे. ईशाने तिच्या मेहनतीच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
ईशाच्या टीमने पुढे म्हटलं आहे की, ‘अफवा काही क्षणात वाऱ्यासारख्या पसरतात, जे फार निराशकारक आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीने आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत केली आहे त्याची प्रतिमा डागाळू शकते. आम्ही सर्वांना विनंती करतो अशा अफवा टाळा आणि ईशाला पाठिंबा द्या. जेणेकरून ती तिच्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचेल.
सांगायचं झालं तर, ईशा, अविनाश सिंह बिग बॉस 18 मध्ये आहेत. विवियन डिसेना आणि ॲलिस कौशिक यांच्यासोबतच्या मैत्रीमुळे ईशा प्रसिद्धीच्या झोतात आली. सोशल मीडियावर देखील ईशा कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
‘बिग बॉस 18’ फिनाले
‘बिग बॉस 18’ शोच्या अंतिम टप्प्यापर्यंत विवियन डीसेना, अविनाश मिश्रा, करण वीर मेहरा, चुम दरंग और रजत दलाल पोहचलेल आहे. त्यामुळे ‘बिग बॉस 18’ शोची ट्रॉफी कोणता स्पर्धक घरी घेऊन जाणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
यंदाच्या सिझनचा ग्रँड फिनाले अत्यंत खास असू शकतो असं देखील सांगण्यात येत आहे. फिनालेमध्ये अभिनेता अक्षय कुमार येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर अभिनेता सलमान खान स्टारर ‘सिकंदर’ सिनेमाची टीम देखील फिनालामध्ये येण्याची शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List