सैफ अली खानचे ते 9 चित्रपट ज्यावर करोडो रुपये लागलेत; हल्ला झालेल्या घटनेचा परिणाम होणार का?
सैफ अली खान शेवटचा चित्रपट देवरा भाग 1 मध्ये दिसला होता. जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. कमाई व्यतिरिक्त हा चित्रपट रिव्ह्यूच्या बाबतीतही चाहत्यांचे प्रेम मिळवू शकला नव्हता. मात्र कोरटाला शिवा दिग्दर्शित या चित्रपटात सैफ अली खानच्या भैरवाच्या भूमिकेला मात्र चाहत्यांचे प्रेम नक्कीच मिळाले.
सैफवरील हल्ल्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सैफच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा झाल्या आहेत.
सैफ अली खानची प्रकृती आता स्थिर असली तरी देखील त्याला जखमा पूर्णपणे बऱ्या होईपर्यंत तरी त्याला आराम करावा लागणार आहे. त्यामुळे आता याचा सैफच्या आगामी चित्रपटांवर काही परिणाम होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सैफचे तब्बल 9 आगामी चित्रपट
सैफचे एक नाही दोन नाही तर तब्बल 9 चित्रपट पाइपलाईनमध्ये आहे. ज्यावर करोडो रुपये लागले आहेत. यात काही साउथ चित्रपटांचाही समावेश आहे. सैफचे 2025 आणि येत्या काही वर्षांत तुम्हाला कोणते चित्रपटात पाहायला मिळणार आहेत? आणि ते 9 चित्रपट नक्की कोणते आहेत ते जाणून घेऊयात.
सैफ अली खानचे 9 आगामी चित्रपट आहेत, त्यापैकी दोन 2025 मध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.एका रिपोर्टनुसार सैफ अली खानचा ‘गो गोवा गॉन 2’ ते ‘स्पिरिट’ पर्यंत असे 9 चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहेत, ज्यावर काम सुरू आहे. यात दाक्षिणात्य आणि बॉलीवूड दोन्ही चित्रपट आहेत.
सैफच्या आगामी चित्रपटांची यादी
गो गोवा गॉन 2, रेस 4, शूटआउट ॲट भायखळा, प्रियदर्शनसोबतही एक प्रोजेक्ट सैफ करणार आहे, सैफचा सारा अली खानसोबतही एक प्रोजेक्ट तो करणार आहे, ज्वेल थीफ. सैफ अली खानच्या दाक्षिणात्य चित्रपटांची यादी पाहायला गेलं तर तो सैफ अली खान देवरा पार्ट 2, स्पिरिट आणि क्लिक शंकरसोबतही एक चित्रपट करणार आहे.
सैफच्या अशा 9 चित्रपटांची यादीच तयार असल्याचं म्हटलं जात आहे. यातील काही चित्रपट हे 2025 मध्ये रिलीज होणार आहेत तर काही पुढील वर्षात.या चित्रपटांवर करोडो रुपये लागले आहेत.
पण सैफवरील हल्ल्यामुळे त्याच्या या आगामी चित्रपटांवर काही परिणाम होऊ शकतो का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच सध्या चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सैफच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली असून तो लवकरात लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List