मल्लिका आणि इमरानला टाकलं मागे; अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा,30 किसींग सीन
बॉलिवूडमध्ये आता कोणत्याही चित्रपटात किसींग सीन, बोल्ड फारच नॉर्मल झाले आहेत. त्यामुळे आता अशा सीन्सवरून शक्यतो चर्चा होताना दिसत नाही. पण एक काळ असा होता जेव्हा किसींग सिन्स आणि बोल्ड सिन्समुळे वादही निर्माण झाले आहेत. असाच एक चित्रपट म्हणजे इमरान हाशमी आणि मल्लिका शेरावतचा मर्डर चित्रपट. या चित्रपटाची गाणी जेवढी फेमस झाली तेवढचं या चित्रपटातील मल्लिका आणि इमरानचे बोल्ड सिन्स. यावरून बराच वादही निर्माण झाला होता.
मल्लिका आणि इमरानला टाकलं मागे
पण एक अभिनेत्री अशी आहे जिने याबाबतीत मल्लिका आणि इमरानला मागे टाकून सगळ्या मर्यादा ओलांडल्या. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या करिअरची सुरूवात चांगली झाली पण मध्येच असं काही घडलं की त्यांच्या करिअर म्हणावं तेवढं पुढे जाऊ शकलं नाही. या अभिनेत्रीचं नावही याच .यादीत येत.
ही अभिनेत्री आहे सोनल चौहान. 2008 मध्ये जिने ‘जन्नत’या सिनेमामधून बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. सोनल पहिल्याच चित्रपटापासून नॅशनल क्रश बनली आणि त्यानंतर तिने अनेक चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओज केले, पण बॉलीवूडमधील तिची कारकीर्द फारशी चांगली राहिली नाही.
एका चित्रपटात 30 किसींग सीन
सोनल चौहानने नंतर साऊथ सिनेमामध्येही काम केलं आहे. ती अजूनही तिथे सक्रिय आहे. सोनल कोणत्या ना कोणत्या हिंदी चित्रपटात सहाय्यक अभिनेत्री म्हणून दिसतेच.पण ती चर्चेत आली ते एका हिंदी चित्रपटातील 30 किसींग सीन्समुळे.
2013 मध्ये, 3G- A Killer Connection हा चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये सोनल चौहान अभिनेता नील नितीन मुकेशसोबत दिसली होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला. पण त्यात तिने 30 किस सीन दिले होते. या चित्रपटात अनेक बोल्ड सीन्सही होते. इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांच्या मर्डर चित्रपटातील किसींग सिन्सचा विक्रम मोडल्याचं यावेळी बोललं गेलं होतं. कारण मर्डर चित्रपटात 20 किसींग सिन्स होते तर आणि 3G चित्रपटात 30 किसींग सिन्स होते. मात्र बोल्ड सीन्स देऊनही हा चित्रपट फ्लॉप ठरला.
सोनल चौहानबद्दल अजून काही
सोनल चौहानचा जन्म 16 मे 1987 रोजी नोएडा येथे झाला. सोनलने दिल्ली पब्लिक स्कूल, नोएडातून शिक्षण घेतले. त्यानंतर सोनलने दिल्लीच्या गार्गी कॉलेजमधून पुढील शिक्षण घेतले. सोनलने 2005 मध्ये मिस वर्ल्ड टुरिझमचा किताब जिंकला आणि हा किताब जिंकणारी सोनल ही पहिली भारतीय आहे. सोनल पहिल्यांदा हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरुर’ अल्बममधील ‘समझो ना’ गाण्यात दिसली होती. यानंतर सोनल पहिल्यांदा इमरान हाश्मीसोबत जन्नत या चित्रपटात दिसली, जो हिट ठरला होता. यानंतर सोनलने अनेक चित्रपट केले, पण ते फारसे यशस्वी झाले नाहीत.
साऊथ चित्रपटात आहे सक्रिय
सोनल चौहानने दक्षिण चित्रपटसृष्टीत तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये चित्रपट केले आहेत. रेनबो (2008) हा त्याचा पहिला तेलगू चित्रपट हिट ठरला होता. यानंतर त्याने नागार्जुन, प्रभास आणि रवी तेजासोबतही हिट चित्रपट केले आहेत. सोनल चौहान अजूनही साऊथ चित्रपटांमध्ये सक्रिय आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List