Saif Ali Khan attack : तो चोरच की आणखी कोण? 24 तास सुरक्षा, बॉडीगार्ड तरीही हल्ला झालाच कसा? घ्या जाणून
बॉलिवूड अभिनेता आणि छोटा नवाब सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अभिनेता सलमान खान याच्या जीवितास धोका असल्याच्या घटना समोर आल्यानंतर आता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्याने बॉलिवूडची चिंता वाढली आहे. मध्यरात्री वांद्रे येथील त्याच्या घरात हा हल्ला झाल्याचे कळते. चोराने सुरूवातीला नोकराशी वाद घातला. आवाजामुळे सैफ अली बाहेर आला. त्याने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता झटापटीत त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. दोन जखमा या खोलवर असल्याचे समजते. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे कळते. दरम्यान 24 तास कडक सुरक्षा असताना ही चोर घरात कसा शिरला हे कोडे अजून सुटलेले नाही. तर हा चोरच होता की इतर कोणी याचा तपास सुरू झाला आहे.
उच्चभ्रू सोसायटीत हल्ला झाला तरी कसा?
मुंबईतीत गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. वांद्रे येथील उच्चभ्रू सोसायटीत तो 12 व्या मजल्यावर राहतो. येथे स्वयंचलित गेट आणि सुरक्षा व्यवस्था असताना हा चोर 12 व्या मजल्यावर पोहचलाच कसा हा मोठा प्रश्न आहे. या इमारतीमधील आणि परिसरातील, तसेच या फ्लॅटमधील सीसीटीव्ही फुटेज आता ताब्यात घेण्यात येत आहेत.
तो चोरच की इतर कोणी?
वांद्रे येथील 12 व्या मजल्यावर सैफ अली खान राहतो. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आहे. तसेच त्याचे खासगी सुरक्षा रक्षक आहेत. लिफ्टच्या ठिकाणी सुद्धा व्यक्ती असते. अशावेळी मध्यरात्री हा चोर इमारतीत घुसला कसा? तो नोकरांशी वाद का घालत होता. तर सैफ अली खानसोबत त्याने झटापट केली. त्यावेळी नोकर काय करत होते. चाकू हल्ल्यात सैफ गंभीर होईपर्यंत आरडाओरड झाली नाही का? तो चोरच होता की इतर कोणी? याचा पोलीस तपास करत आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने घरातील नोकर, लिफ्ट मॅन, सुरक्षा रक्षक यांची चौकशी सुरू केली आहे. नोकरांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
केव्हा घडली घटना?
अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर खान या दोघांचे वांद्रे येथील सदगुरू या इमारतीत 12 व्या मजल्यावर राहतात. हा हल्ला चोरट्याने केल्याचे समोर येत आहे. गुरूवारी मध्यरात्री 3 वाजेच्या जवळपास ही घटना घडली. सैफ अली खान याच्यावर 6 वार झाले. त्याला लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List