सैफ अली खानसोबत अज्ञात व्यक्तीचा मोलकरणीवरही हल्ला; हाताला इजा अन्….

सैफ अली खानसोबत अज्ञात व्यक्तीचा मोलकरणीवरही हल्ला; हाताला इजा अन्….

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास चाकूने हल्ला करण्यात आला. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. एवढी मोठी घटना कशी घडली हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे.

सैफ अली खानला पहाटे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच डॉ. नितीन डांगे, डॉ. लीना जैन यांच्याकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात असल्याची माहितीही समोर आली आहे.

सैफसोबत मोरकरणीवरही हल्ला

तसेच सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यापैकी दोन जखमा खोलवर आहेत. त्यातील एक जखम मनक्यावर देखील असल्याचं म्हटलं जातं. तर सैफवर ऐकूण 6 वार करण्यात आल्याची धक्कादायक माहितीही मिळत आहे.

दरम्यान सैफसोबत त्या अज्ञात व्यक्तीने मैलकरीणवरही हल्ला केला असल्याची माहिती मिळतेय. या हल्ल्यामध्ये तिच्या हाताला जखम झाली आहे. तिच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी हल्ल्याबाबत मोलकरीणचा जबाब पोलिसांकडून घेतला जातोय.

अज्ञात व्यक्ती मोलकरणीसोबत वाद घालत असताना सैफवरही हल्ला

दरम्यान वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की, काल रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसला आणि मोलकरणीसोबत वाद घालू लागला.

जेव्हा अभिनेत्याने हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करून त्याला जखमी केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सुरक्षारक्षकांचे मोबाईल जप्त 

तसेच वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक चित्रपट अभिनेता सैफ अली खानच्या घरी पोहोचले असून पोलिस सैफ अली खानच्या इमारतीतील सीसीटीव्ही आणि आजूबाजूच्या इमारतींचे सीसीटीव्ही तपासत आहेत.

एवढच नाही तर पोलिसांनी सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या लोकांचे आणि सुरक्षारक्षकांचे मोबाईल जप्त केले आहेत. पोलिसांनी काही लोकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले आहे.

 

हल्लेखोर कोण होता, तो कुठून आला आणि त्याने कोणत्या उद्देशाने हल्ला केला, याबाबतची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. त्यामुळे हा हल्लेखोर नेमका कोणत्या उद्देशान घरात घुसला याचा पोलिस कसून तपास करत आहे. तसेच हा हल्ला आणि त्याबद्दलचे अनेक महत्त्वाचे अपडेट येण्याची शक्यता आहे, चाहत्यांनाही सैफची काळजी वाटत असून अनेकांनी सोशल मीडियावर त्याच्यासाठी कमेंटस् करण्यास सुरुवात केली आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सैफ अली खानवरील हल्ल्याला धार्मिक रंग? जितेंद्र आव्हाड यांची संशयाची सुई कुणावर, केला हा गंभीर आरोप सैफ अली खानवरील हल्ल्याला धार्मिक रंग? जितेंद्र आव्हाड यांची संशयाची सुई कुणावर, केला हा गंभीर आरोप
व्हीआयपींवरील हल्ल्यामुळे पुन्हा एकदा मुंबई हादरली. सलमान खान, बाबा सिद्दीकी आणि आता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर विरोधकांनी सरकारला घेरले आहे....
जखमी सैफ अली खानच्या प्रकृतीची हॉस्पिटलमधून अपडेट; डिस्चार्जबाबतही महत्त्वाची माहिती समोर
Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली..
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला, देवरा को-स्टारला धक्का, ज्युनिअर एनटीआर म्हणाला..
व्हिस्कीच्या बाटलीने वार; सैफ अली खानवर नाइट क्लबमध्येही झाला होता हल्ला; कारण धक्कादायक
डॉक्टरांना सैफच्या शरीरात आढळला धारदार तुकडा; कशी आहे प्रकृती?
Sanjay Raut : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याला संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींशी जोडलं, म्हणाले….