थर्टी फर्स्टच्या पार्टीनंतर धडपडली मौनी रॉय; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले ‘इतकी प्यायची तरी का?’

थर्टी फर्स्टच्या पार्टीनंतर धडपडली मौनी रॉय; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले ‘इतकी प्यायची तरी का?’

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी विविध पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींनीही जंगी पार्टी केली. अशाच एका पार्टीनंतरचा अभिनेत्री मौनी रॉयचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पती सूरज आणि खास मैत्रीण दिशा पटानीसोबत मौनी मुंबईतल्या एका क्लबमध्ये पार्टीसाठी गेली होती. या पार्टीनंतर क्लबबाहेर येताना पापाराझींनी तिच्यासमोर घोळका केला. अशातच गाडीकडे चालत जाणारी मौनी पायऱ्यावर धडपडते. मद्यपानामुळे तिचा तोल गेल्याचं या व्हिडीओत स्पष्ट पहायला मिळतंय. त्यावरूनच काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये अभिनेत्री मौनी रॉय, तिचा पती सूरज आणि अभिनेत्री दिशा पटानी हे तिघं कारच्या दिशेने चालत असताना त्यांच्याभोवती पापाराझींचा घोळका झाल्याचं पहायला मिळतंय. पापाराझींमधून वाट काढत ते कारकडे जाण्याचा प्रयत्न करत असतानाच मौनी धडपडते. त्यानंतर तिचा पती सूरज आणि दिशा तिला सांभाळतात. अखेर सूरज तिला पकडून कारच्या दिशेने घेऊन जातो. त्यानंतर दिशा त्यांच्यापाठोपाठ कारमध्ये जाऊन बसते. यावेळी दिशासुद्धा तिची मान खाली घालून चेहरा न दाखवता चालू लागते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात मर्यादेपेक्षा जास्त ढवळाढवळ करू नका, असं म्हणत काहींनी पापाराझींना सुनावलंय. मौनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाका, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. तर काहींनी मौनीवर टीका केली आहे. ‘झेपत नाही तर इतकी प्यायची तरी कशाला’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘थर्टी फर्स्ट जरा जास्तच जोरात साजरी केली वाटतं’, असं दुसऱ्याने म्हटलं आहे. मुंबईतील वांद्रे परिसरातील ही घटना आहे.

मौनी आणि दिशा पटानी यांना अनेकदा एकत्र पाहिलं जातं. या दोघी एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. थर्टी फर्स्टसुद्धा दोघींनी एकमेकींसोबत साजरा केला. मौनीने 2022 मध्ये सूरज नांबियारशी लग्न केलं. सूरज हा प्रसिद्ध बँकर आहे. तसंच त्याचा बिझनेससुद्धा आहे. 2019 मध्ये सूरज आणि मौनी यांची दुबईत एका पार्टीदरम्यान भेट झाली होती. या भेटीदरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली आणि नंतर त्याचं प्रेमात रुपांतर झालं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सीनदरम्यान अभिनेत्याच्या ओठांचा स्पर्श होताच अभिनेत्रीला उलट्या; 100 वेळा दात घासले अन् तोंड धुतलं सीनदरम्यान अभिनेत्याच्या ओठांचा स्पर्श होताच अभिनेत्रीला उलट्या; 100 वेळा दात घासले अन् तोंड धुतलं
बॉलिवूड सिनेमा, वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स आजकाल अगदी सामान्य बाब झाली आहे. बोल्ड सीन्स किंवा एखादा किसींग सीन हा चित्रपटात...
लंडनमध्ये पँटशिवाय फिरतायत तरुण-तरुणी, काय आहे ‘नो ट्राउजर ट्यूब राइड’? जाणून घ्या…
दापोली तालुक्यातील शासकीय कार्यालयात बायोमेट्रिकचे तीन तेरा; प्रशासनाचे दुर्लक्ष
केंद्रात प्रतिनियुक्तीवर सेवा देणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय पेन्शन मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
महायुती सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका; सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावरून नगरविकास खात्याच्या मुख्य सचिवांना समन्स
गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन होणे हे गृहमंत्रालयाचे अपयश – सुप्रिया सुळे
रत्नागिरीतील शाळेतील आणखी एका लंपट शिक्षकाचा कारनामा उघड, विद्यार्थीनींना केले अश्लील मेसेज