‘3 इडियट्स’मधील सेंटिमीटर आठवतोय का? आता ‘या’ मराठी मालिकेत करतोय काम

‘3 इडियट्स’मधील सेंटिमीटर आठवतोय का? आता ‘या’ मराठी मालिकेत करतोय काम

2009 मध्ये प्रदर्शित झालेला आमिर खानचा ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट तुफान गाजला होता. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. यातील काही भूमिकांची नावंसुद्धा अजब होती. सेंटिमीटर, मिलीमीटर.. अशीही काही पात्रांची नावं होती. त्यापैकी सेंटिमीटरची भूमिका साकारलेला अभिनेता तुम्हाला आठवतोय का? अभिनेता दुश्यंत वाघने ही भूमिका साकारली होती. आता तो 37 वर्षांचा झाला आहे. ‘थ्री इडियट्स’मधला हाच सेंटिमीटर सध्या झी मराठी वाहिनीवरील नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 23 डिसेंबरपासून ही मालिका सुरू झाली असून त्यातील आता दुश्यंतच्या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधलंय.

अभिनेत्री सुप्रिती शिवलकरने सोशल मीडियावर दुश्यंतसोबतचे मालिकेतील काही फोटो पोस्ट केले आहेत. मालिकेत श्रीकांत या पात्राच्या बहिणीची भूमिका सुप्रिती साकारतेय. तर दुश्यंत हा तिच्या नवऱ्याच्या (रवी) भूमिकेत आहे. सुप्रितीने शेअर केलेल्या तिसऱ्या फोटोमध्ये दुश्यंतचा आताचा लूक स्पष्ट पहायला मिळतोय. ‘थ्री इडियट्स’मध्ये त्याची खूप छोटीशी भूमिका होती. मात्र त्यातही त्याने विशेष छाप पाडली होती. म्हणूनच आता झी मराठीच्या मालिकेत दृश्यंतला पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दुश्यंतने ‘थ्री इडियट्स’सोबतच ‘तेरा मेरा साथ रहें’, ‘डोंबिवली फास्ट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ‘ना बोले तुम ना मैं कुछ कहा’, ‘इश्क में मरजावा’ या मालिकांमध्येही त्याने काम केलंय.

‘लक्ष्मी निवास’ या मालिकेच्या निमित्ताने मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच दररोज एक तासाचा भाग प्रक्षेपित होत आहे. दररोज मालिकेचा एक तासाचा भाग प्रक्षेपित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 23 डिसेंबर 2024 पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत तुषार दळवी, हर्षदा खानविलकर, अक्षया देवधर यांच्या भूमिका आहेत.

‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न बघणाऱ्या एका मध्यमवर्गीय जोडप्याची कहाणी दाखवण्यात आली आहे. लक्ष्मी एका श्रीमंत घरात वाढलेली मुलगी. श्रीनिवासवर असलेल्या अतोनात प्रेमामुळे तिनं त्याच्याशी पळून जाऊन लग्न केलं आणि माहेरशी असलेले सगळे संबंध तिला तोडावे लागले. श्रीनिवासकडे स्वतःच्या हक्काचं घर नाही यावरुन झालेला अपमान असह्य झाल्याने तिने स्वतःचं घर होईपर्यंत माहेरी पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मी आणि श्रीनिवासचा संसार उत्तम फुलला. तीन मुलं, तीन मुली आणि श्रीनिवासची आई इतकं मोठं कुटुंब झालं. आता दोन मुलींची लग्न बाकी आहेत. लक्ष्मी आणि श्रीनिवास समोर अनेक आव्हानं आहेत. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च, पत्रिकेत दोष असलेल्या मुलीचं लग्न जुळवणं, घरातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांची मोट बांधून त्यांना एकत्र धरुन ठेवणं अशा एक ना अनेक आव्हानांचा सामना या जोडप्याला करावा लागत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महायुतीचे नेते अन् कार्यकर्ते करणार गावागावात ‘डब्बा पार्टी’, कारण… महायुतीचे नेते अन् कार्यकर्ते करणार गावागावात ‘डब्बा पार्टी’, कारण…
PM Narendra Modi Mumbai Visit: विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीला 230 जागांवर यश मिळाले. त्यात भाजप सर्वात मोठा...
  टॅक्सी-ऑटो रिक्षा भाड्याचा टप्पा एक किलोमीटर करावा, भाडे वाढ करु नये, जनता दलाची मागणी
लाल साडी, हातात बांगड्या अन् सिंदुर; नवी नवरी शोभिताने कसा साजरा केला लग्नानंतरचा पहिला पोंगल? नेटकऱ्यांकडून कौतुक
दिल्लीतील भाजप उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
Video – धनंजय मुंडे वाल्मीक कराडच्या आई-पत्नीला भेटले?
Walmik Karad – बीड कोर्टाबाहेर राडा, कराड समर्थक आणि कराड विरोधकांची घोषणाबाजी
Video – संकटकाळात मदत करणाऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा कधी पाहिली नाही – राऊत