कधी अशी… कधी तशी.. महाकुंभमधील मॉडर्न साध्वीचे हॉट फोटो व्हायरल

कधी अशी… कधी तशी.. महाकुंभमधील मॉडर्न साध्वीचे हॉट फोटो व्हायरल

आज महाकुंभाचा तिसरा दिवस आहे. ज्यामध्ये दररोज करोडो लोक त्रिवेणी संगमात स्नान करत आहेत. ग्लॅमरस दुनियेशी निगडित सेलिब्रिटीही कुंभमध्ये श्रद्धेने तल्लीन झाले आहेत. अशीच एक अभिनेत्री जी आता बोल्ड आणि झगमगटापासून दूर होऊन अध्यात्माकडे वळाली आहे. या अभिनेत्रीची चर्चा सध्या प्रचंड प्रमाणात पाहायला मिळत आहे.

बोल्ड, बिनधास्त असणारी, आपलं हवं तसं आयुष्य जगणारी ही अभिनेत्री आता महाकुंभ मेळ्यात साध्वीच्या रुपात पाहायला मिळतेय. तिचं हे रुपसुद्धा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हर्षा रिचारियाचे सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

हर्षा रिचारियाचा, नाव वाचून आलंच असेल लक्षात तुमच्या ही अभिनेत्री नक्की कोण आहे ते. सध्या कुंभमेळ्यात या अभिनेत्रीची चर्चा आहे. पण तुम्हाला माहितीये का की हर्षाची ग्लॅमरस जग हे फार वेगळं होतं. तिचे इंस्टावरचे रील, फोटो, व्हिडीओ तुम्हाला विश्वास बसणार नाही की ही तिच अभिनेत्री आहे जी स्वत:ची आता एक साध्वी म्हणून ओळख करून देत आहे.

स्वत:चं आयुष्य अगदी स्वत:च्या मनाप्रमाणे, आपल्याला हवं तसं जगणारी हर्षा आता आध्यात्मात गुंग झाली आहे. आता तिला ग्लॅमरस जग नको असून तिला आध्यात्मिक प्रवास हवा आहे. हर्षाच्या सौंदर्याचं कौतुक नेहमीच तिच्या यूजर्सकडून होताना दिसतं. इंस्टाग्रामवर हर्षाचे 9 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.


हर्षाचे आधीचे अन् आताचे रुप पाहून विश्वास बसणार नाही 

तिचे आधीचे रुप आणि आताचे रुप पाहून तुम्हाला विश्वसच नाही बसणार की तिच अभिनेत्री आहे का? तिच्यात इतका बदल कसा झाला याचंच सर्वांना आकर्षण वाटतं आहे. पण हर्षाने आता हे मनोरंजनाचं जग सोडण्याचा निर्णय घेतलाय.

कुंभमधील हर्षा रिचारियाचा व्हिडिओ 

दरम्यान कुंभमधील हर्षा रिचारियाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गळ्यात रुद्राक्ष व फुलांची माळ दिसत असून कपाळावर टिळक लावलेला आहे. ज्यात त्यांनी मी उत्तराखंडचा असून आचार्य महामंडलेश्वरांचा शिष्य असल्याचे सांगितले आहे.

हर्षाने स्वत: हा मार्ग स्विकारला आहे. ती म्हणाली की, ” मला जे काही करायचे होते ते सोडून मी हा मार्ग स्वीकारला. ते पुढे म्हणाले की भक्ती आणि ग्लॅमरमध्ये कोणताही विरोधाभास नाही.

शिवाय आपल्या आधीच्या ग्लॅमरस आयुष्याबद्दल, तिच्या सोशल मीडियावरील फोटबद्दल बोलताना ती म्हणाली की, ती  त्या फोटोंना हटवू शकली असती, पण तिने तसे केले नाही. कारण हा तिचा खरा प्रवास आहे.

तसेच ती म्हणाली की, तरुणांना सांगू इच्छितो की, तुम्ही कोणत्याही मार्गाने देवाकडे जाऊ शकता. असं म्हणत आधीची हर्षा आणि आताची हर्षा यात काय फरक झाला हे, हा प्रवास तिने कसा केला हे समजावं म्हणून तिने हे फोट आणि व्हिडीओ तसेच ठेवले आहेत.


हर्षाने साध्वीचा मार्ग का स्विकारला?

दरम्यान तसं पाहायला गेलं तर, भक्तीसोबतच एखादी व्यक्तीही आपले काम सांभाळू शकते, पण साध्वी झाल्यानंतर तिने स्वतःहून निर्णय घेतला की ती तिचे व्यावसायिक जीवन सोडून भक्तीमध्ये पूर्णपणे रमून गेली आहे. याबद्दल हर्षाने सांगितले की, “मी सर्व काही सोडून संन्यासाच्या मार्गावर आलो आहे.

या निर्णयामुळे तो पूर्णपणे खूश आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे समाधान मिळते. मी शांततेच्या शोधात हे जीवन निवडले आणि मला आकर्षित करणारे सर्व काही सोडले आहे.” असं म्हणत तिने हा मार्ग का स्विकारला याबद्दल सांगितले आहे.

हर्षा ही मूळची उत्तराखंडची आहे, दरम्यान आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंदगिरी महाराज यांना ती दीड वर्षांपूर्वी भेटली होती. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांची शिष्या होऊन तिने आपला आध्यात्मिक प्रवास सुरू केला.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महायुतीचे नेते अन् कार्यकर्ते करणार गावागावात ‘डब्बा पार्टी’, कारण… महायुतीचे नेते अन् कार्यकर्ते करणार गावागावात ‘डब्बा पार्टी’, कारण…
PM Narendra Modi Mumbai Visit: विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीला 230 जागांवर यश मिळाले. त्यात भाजप सर्वात मोठा...
  टॅक्सी-ऑटो रिक्षा भाड्याचा टप्पा एक किलोमीटर करावा, भाडे वाढ करु नये, जनता दलाची मागणी
लाल साडी, हातात बांगड्या अन् सिंदुर; नवी नवरी शोभिताने कसा साजरा केला लग्नानंतरचा पहिला पोंगल? नेटकऱ्यांकडून कौतुक
दिल्लीतील भाजप उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
Video – धनंजय मुंडे वाल्मीक कराडच्या आई-पत्नीला भेटले?
Walmik Karad – बीड कोर्टाबाहेर राडा, कराड समर्थक आणि कराड विरोधकांची घोषणाबाजी
Video – संकटकाळात मदत करणाऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा कधी पाहिली नाही – राऊत