फोन, हत्या आणि अपहरण; वाल्मीक कराडला कोर्टाने सुनावली 7 दिवसांची SIT कोठडी
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आरोपी वाल्मीक कराडला न्यायालयाने 22 जानेवारीपर्यंत म्हणजेच 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे. आज वाल्मीक कराडला बीडच्या न्यायालयात हजार करण्यात आलं होतं. यातच एसआयटी आणि सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने त्याला 7 दिवसांनची एसआयटी कोठडी सुनावली आहे.
न्यालयात काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडवर मकोका आणि 302 चा गुन्हा दाखल केला असून तो सध्या एसआयटीच्या ताब्यात आहे. यातच त्याला आज न्यायालयात हजार करण्यात आलं. न्यायालयात युक्तिवाद करताना एसआयटीने सांगितलं की, ज्या दिवशी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या झाली, त्याच दिवशी आरोपी वाल्मीक कराड याचं विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याशी फोनवरून संवाद झाला होता. या तिघांचा त्याच दिवशी दुपारी 3.20 मिनिटे ते 3.40 दरम्यान फोनवर संभाषण झाला.
एसआयटीने न्यायालयात सांगितलं की, देशमुख यांच्या हत्याआधी कराडने त्यांना धमकी दिली होती. यावेळी आपला युक्तिवाद मांडताना एसआयटीने वाल्मीक कराडची 10 दिवसांची कोठडी मागितली. मात्र न्यायालायने कराड याला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List