वाल्मीक कराडला आणखी एक धक्का! केजमधील वाईन शॉपचं ‘ना हरकत प्रमाणपत्र’ रद्द
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपी वाल्मीक कराडवर मकोकोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सीआयडीच्या विशेष पथकाकडे त्याचा ताबा देण्यात आला आहे. वाल्मीक कराडला आणखी एक धक्का देण्यात आला आहे. वाल्मीक कराडच्या केजमधील वाईन शॉपसाठी देण्यात आलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. खंडणीप्रकरणी न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता वाल्मीकला सीआयडी पोलिसांना मकोका अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक केली आहे.
परळीतील वातावरण तापत असल्याने वाल्मीकला केज ऐवजी बीड न्यायालयात हजर केलं जात आहे. आता वाल्मीक कराडवर आमखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. सीआयडी पोलिसांनी वाल्मीकवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर, पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत वाल्मीक कराडचा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली. वाल्मिक कराडच्या या अलिशान फ्लॅटचा ताबा घेण्यात आला असून लवकरच लिलाव होणार असल्याची माहिती आहे. मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी ही कारवाई केली जाऊ शकते.
वाल्मीक कराडला आता आणखी एक धक्का देण्यात आला आहे. केज नगर पंचायतने वाल्मीक कराडच्या वाईन शॉपला दिलेले ना हरकात प्रमाणपत्र रद्द केले आहे. वाल्मीक कराडने केज शहरामध्ये एक वाईन शॉप विकत घेतले होते. हे वाईन शॉप विकत घेताना बेकायदेशीररित्या केज नगरपंचायतकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला होता. त्यानंतर, नगर पंयायतीने या वाईन शॉपचे लायसन्साठी दिलेले ना हरकात प्रमाणपत्र रद्द केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List