युजवेंद्र चहल सोबत घटस्फोटाच्या चर्चा, बायको धनश्री वर्मा म्हणाली…
युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांच्या नात्यामध्ये काही वाद सुरु असल्याचं अनेकदा सांगण्याात आलं. म्हणून दोघे लवकरच घटस्फोट घेण्याची शक्यता आहे… असं देखील सांगण्याता येत आहे. एवढंच नाही तर, दोघांनी इन्स्टाग्रामवर देखील एकमेकांना अनफॉलो केलं आहे. पण यावर दोघांनी देखील मौन बाळगलं आहे.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे युजवेंद्र चहल याने सोशल मीडियावर बायकोसोबत असलेले फोटो देखील डिलिट केले आहे. दरम्यान, दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना धनश्रीला पहिल्यांदा स्पॉट करण्यात आलं आहे. धनश्री पाहिल्यानंतर तिच्या भोवती पापाराझींची गर्दी जमली. अशात फोटो क्लिक करु नका अशी विनंती धनश्रीने केली.
पापाराझी धनश्रीचे फोटो क्लिक करत असताना ती म्हणाली, ‘बस ना अब…’, यावेळी धनश्रीचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला. धनश्रीने पांढरा शर्ट आणि काळा स्कर्ट घातला होता. हाय हिल्स मध्ये धनश्री ग्लॅमरस दिसत होती. सध्या धनश्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
धनश्री आणि युजवेंद्र यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. 22 डिसेंबर 2020 मध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केलं. पण आता दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.
धनश्री हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘झलक दिखला जा 11’ मध्ये धनश्रीने तिच्या डान्सने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. शोमध्ये धनश्रीने वाइल्ड कार्ड केली होती. तेव्हा बायकोच्या सपोर्टसाठी युजवेंद्र देखील शोमध्ये पोहोचला होता. यावेळी युजवेंद्र याने खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या होत्या. युजवेंद्र सांगितलं होतं की, तो बायकोला प्रेमाने भिंडी म्हणून बोलावतो.
धनश्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी धनश्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नेटकरी देखील धनश्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List