उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘या’ 3 पद्धतीने लसणाचे करा सेवन

उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘या’ 3 पद्धतीने लसणाचे करा सेवन

आजच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे कामाचा तणाव, नियमित वेळेवर आहार न घेणे, तसेच फास्ट फूडचे अधिक सेवन यामुळे उच्च कोलेस्टेरॉलची समस्या खूप सामान्य झाली आहे. खराब जीवनशैली आणि आहारामुळे शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात आणि त्याने तुम्हाला हृदयरोग होऊ शकतो. अशावेळी आयुर्वेद आणि घरगुती उपायांच्या मदतीने या समस्येवर नियंत्रण मिळवता येते.

यासाठी तुमच्या स्वयंपाकघरात रोजच्या जेवणात वापरले जाणारे लसूण यावर रामबाण उपाय आहे. कारण लसूण हा एक नैसर्गिक उपाय आहे जो उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. लसूणमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास आणि रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला देखील या समस्यांपासून सुटका मिळवायची असेल तर आम्ही तुम्हाला लसणाच्या 3 प्रभावी मार्गांबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकता.

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण खा

  1. रिकाम्या पोटी खा कच्चा लसूण

रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने त्याच्या तुमच्या शरीरातील पोषक तत्वांवर थेट परिणाम होतो. तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी १-२ कच्च्या लसणाच्या पाकळ्या चावून खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. हे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवते. तसेच रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते.

  • १-२ लसणाच्या पाकळ्या सोलून सकाळी चावून घ्याव्यात.
  • यानंतर कोमट पाणी प्यावे.

 2. मध आणि लसूण मिश्रण

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण आणि मध यांचे मिश्रण तुमच्यासाठी एक शक्तिशाली उपाय आहे. मधात अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. यामुळे हृदय मजबूत होते आणि नसांमधील ब्लॉकेज दूर होतात.

४-५ लसूण पाकळ्या बारीक चिरून त्यात १ चमचा मध घालून त्याचे रोज सकाळी रिकाम्या पोटी हे खा.

3. लसूण आणि लिंबू डिटॉक्स पाणी

लसूण आणि लिंबू डिटॉक्स पाणी शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल आणि विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. रक्त स्वच्छ करते आणि कोलेस्टेरॉल कमी करते.

लसणाच्या २-३ पाकळ्या कापून एक ग्लास कोमट पाण्यात टाका. त्यात अर्धा लिंबाचा रस पिळून सकाळी रिकाम्या पोटी प्यावे.

लसूण खाण्याचे फायदे

  • लसण्याच्या सेवनाने हृदयाचे स्नायू बळकट होतात.
  • रक्तदाब नियंत्रित करतो.
  • लसूण हे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि सर्दी-खोकल्यापासून बचाव करते.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • लसूण मर्यादित प्रमाणात खा कारण जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटात जळजळ होऊ शकते.
  • जर तुम्ही कोणत्याही गंभीर आजाराने त्रस्त असाल तर लसूण खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अनाथालये, बालगृहांमधील मुलांची वयोमर्यादा 21 वर्षे, ‘म्हाडा’ लॉटरीतही आरक्षण   अनाथालये, बालगृहांमधील मुलांची वयोमर्यादा 21 वर्षे, ‘म्हाडा’ लॉटरीतही आरक्षण  
अनाथालये व बालगृहांमध्ये राहणाऱ्या अनाथ मुलांची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 21 वर्षांपर्यंत वाढवण्यात येणार असून ‘म्हाडा’च्या सदनिकांमध्ये अनाथ मुलांसाठी राखीव आरक्षण...
रेल्वे स्थानक परिसर, धार्मिक-पर्यटन स्थळे, खाऊगल्ल्या होणार चकाचक; महापालिका राबवणार कचरामुक्त तास मोहीम
200 वर्षे जुन्या मंदिरात लग्न लावल्याने वाद
Shahapur accident – चालकाचं नियंत्रण सुटलं, शहापूर जवळ 5 वाहनांचा विचित्र अपघात; 3 ठार, 14 जखमी
लक्षवेधक – अबब! 8 फूट रुंदीचा टीसीएल टीव्ही लाँच
फडणवीस यांचे पुन्हा ‘एक है तो सेफ है’, पानिपतमधील शौर्यभूमीला केले वंदन
आकाला धक्का! कराडला मोक्का!! समर्थकांकडून बंद, हिंसाचार, जाळपोळ… परळीत तणाव आणि भीती