महायुतीला फक्त 107 जागा मिळाल्यात, 150 मतदारसंघात गडबड केली; उत्तम जानकर यांचा खळबळजनक दावा

महायुतीला फक्त 107 जागा मिळाल्यात, 150 मतदारसंघात गडबड केली; उत्तम जानकर यांचा खळबळजनक दावा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांबाबत खळबळजनक दावा केला आहे. त्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. निवडणूक निकालास सुमारे 150 मतदारसंघात गडबड झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जानकर यांनी ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा आरोप केला आहे. महायुतीला फक्त 107 जागा मिळाल्या आहेत, असे जानकर यांनी म्हटले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर एक्झिट पोलचे जे अंदाज होते, त्यामध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव होईल, असं कुठेही म्हटलेलं नव्हतं. अनेक संस्थांच्या सर्व्हेमध्ये तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काँटे की टक्कर असेल, असं म्हटलं होतं. पण निकाल त्यापेक्षा फार वेगळे लागले. महायुतीला 230 पेक्षाही जास्त जागांवर विजय मिळाला. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी निकालाबाबत खळबळजनक दावे केले आहेत.

विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघांमध्ये गडबड झालेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत 20 हजार मतांनी पराभूत झाले आहेत. तर महायुतीला फक्त 107 जागा मिळाल्या आहेत. ईव्हीएम कंट्रोस बॉक्समध्ये गडबड झाली आहे. पण तांत्रिकदृष्ट्या ते लक्षात येत नाही, असं उत्तम जानकर यांचं म्हणणं आहे. जानकरांनी आकडेवारीतूनच गणित मांडत हा दावा केला आहे.

निवडणुकीत 150 जागांवरर यांनी गडबड केली आहे. त्यांच्या आलेल्या मतदारसंघांची माहिती काढल्यानंतर अजित पवारही 20 हजार मतांनी पराभूत झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. अजित पवारांना 1 लाख 80 हजार मते पडली आहेत, वनथर्ड म्हणजे तिनाशी एक असं प्रोपोशन इथे लावलेलं होतं. त्यामुळे युगेंद्र पवार यांची मते 80 हजार अधिक 60 हजार अशी 1 लाख 60 हजार मते आहेत. अजित दादा यांचे 1 लाख 80 हजारमधील 60 हजार मायनस होतात आणि त्यांना 1 लाख 20 हजार अशी मते राहतात, असा मोठा दावा उत्तम जानकर यांनी केला.

अजित दादा यांचे फक्त 12 आमदार निवडून आले आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे फक्त 18 आमदार निवडून आले आहेत. तर भाजपचे 77 आमदार निवडून आले आहेत. अशी त्यांची सर्व मिळून 107 आणि अपक्ष मिळून 110 अशी त्यांची संख्या आहे. मी प्रत्येक मतदारसंघाचा सखोलपणाने अभ्यास केला आहे, असेही उत्तम जानकर यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शाहरुख खानचा लंडनमधील बंगला म्हणजे आलिशान महालच; फोटो व्हायरल,चाहते मात्र संतापले शाहरुख खानचा लंडनमधील बंगला म्हणजे आलिशान महालच; फोटो व्हायरल,चाहते मात्र संतापले
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानबद्दल काही वेगळं सांगायला नको. शाहरूख खान म्हणजे लाखो नाही तरी करोडो दिल की धडकन आहे....
शरीराच्या ‘या’ भागावर होतो परिणाम… बसल्या बसल्या पाय हलवता? लगेच सोडून द्या सवय
कोल्ड ड्रिंक आणि प्रोटीन शेक एकत्र प्यायल्यामुळे काय होते? जाणून घ्या दुष्परिणाम
हिवाळ्यामध्ये आलू बुखारा खाण्याचे जबरदस्त फायदे… ऐकुन व्हाल थक्क
ब्राउन शुगर किंवा मध? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय फायदेशीर
नातं टिकवा, नातं मजबूत करा… 2025 मधील महत्त्वाच्या टिप्स काय?
सीआयडीला जमत नसेल तर शिवाजी साटम यांच्याकडे तपास द्या; संतोष देशमुख हत्याप्रकरणावर अंजली दमानिया यांचा टोला