ठाणे स्थानकात उभा राहणार ११ मजली टॉवर, RLDA चे टेंडर, पाहा काय आहेत सुविधा
मध्य रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. या स्थानकाचा पुनर्विकासात ११ मजली भव्य टॉवर उभारण्यात येणार असून त्यात बेसमेंटमध्ये पार्किंग आणि इतर आठ मजल्यांचा कमर्शियल वापर होणार आहे. रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने ( RLDA ) या संदर्भात निविदा मागविली आहे.रेल्वे जमीन विकास प्राधिकरण आणि ठाणे महानगर पालिका ठाणे रेल्वे स्थानकाचा मल्टी मोडल ट्राझिस्ट हब म्हणून सॅटीस अंतर्गत विकास करत आहे. या विकासात ठाणे पूर्वेकडील जागेत ९००० चौरस मीटर जागेचा व्यावसायिक विकास केला जाणार आहे.
ठाणे रेल्वे स्थानकाचा असा होणार कायापालट – पाहा प्लान
ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या १० (अ ) प्लॅटफॉर्मजवळील जागेचा विकास केला जात आहे. या जागेवर ११ मजली टॉवर – १ उभारला जामार आहे. यात बेसमेंटला वाहनांच्या पार्किंग आणि सर्व्हीसची सुविधा असणार आहे. तर तळमजला आणि पोट मजल्यावर रेल्वे सुविधा आणि कॉनकोर्स फ्लोअर प्रवाशांच्या बसेससाठी असणार आहे. आणि आठ अतिरिक्त मजल्यांचा व्यावसायिक वापर केला जाणार आहे.
रेल्वे जमीन विकास प्राधिकरण ( RLDA ) आठ मजल्यातील २४,२८० चौरस मीटर बिल्टअप जागा ६० वर्षांच्या भाडे करारावर देणार आहे. भाडेतत्त्वावरील क्षेत्र बेअर-शेल संरचना म्हणून दिले जाणार आहे. तर कॉमन एरिया आणि युटिलिटीजचे बांधकाम RLDA करणार आहे. हा ११ मजली टॉवर-१ इमारत बांधून झाल्यानंतर त्यातील जागा भाडेतत्त्वावरील जागा ३० जून २०२६ पर्यंत हस्तांतरित केली जाणार आहे. या संदर्भातील निविदा १५ जानेवारी २०२५ रोजी स्वीकारण्यात येणार आहेत.निविदा भरण्याची शेवटची तारीख आणि उघडण्याची तारीक ३१ जानेवारी २०२५ असणार आहे.
मेट्रो, बस आणि रेल्वे एकाच छताखाली
सॅटीस अंतर्गत चांगल्या कनेक्टीव्हीटीसाठी २.२४ किलोमीटरचा वर्तुळाकार एलिव्हेटेड रोड लिंक स्पॅनिंग ठाणे महानगर पालिका उभारणार आहे. हा मार्ग पूर्वद्रुतगती महामार्ग ते ठाणे रेल्वे स्थानक पूर्व असा असणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १० येथील एलिवेटेड डेकला हा मार्ग जोडण्यात येणार आहे.या मार्गामुळे प्रवाशांना कॉनकोर्सला पोहचता येणार आहेच शिवाय इतर व्यावसायिक कारणांसाठी येणाऱ्या नागरिकांना हा मार्ग सोयीचा होणार आहे. येथे मल्टी मोडल ट्राझिस्ट हब अंतर्गत बस,रेल्वे,आणि मेट्रो जोडली जाणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List