करोनाचे व्हॅक्सिन HMPV ला लागू होणार की घ्यावी लागणार दुसरी लस? विषाणूशास्त्रज्ञ काय म्हणतात?
सध्या जगभरात करोनानंतर HMPV विषाणूमुळे भीतीचे वातावरण झालं आहे. गेल्या काही आठवड्यांपासून चीनमध्ये या विषाणूचा कहर पाहायला मिळत होता, मात्र आता या विषाणूने भारतात आणि महाराष्ट्रातही आपली वर्णी लावली आहे. हाराष्ट्रातील नागपुरातीही आता HMPV चे रूग्ण आढळले आहेत. सोबतच देशातील काही लोकांना एचएमपीव्हीची लागण झाली आहे.
मेटाप्युमोव्हायरस आणि करोना व्हायरसची काही लक्षणे सारखीच
विषाणूपासून बचाव करण्यासाठी सरकार योग्य ती काळजी घेत आहेत. या आजाराची लक्षणे. त्यापासून घ्यायची काळजी या सर्वांबद्दलची माहिती हळूहळू आता नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे. पण हा विषाणू नक्की किती धोकादायक आहे याबद्दल नक्की माहिती नाही. पण ह्युमन मेटाप्युमोव्हायरस आणि कोरोना व्हायरसची काही लक्षणेही सारखीच असल्याचं म्हटलं जातं आहे.
ज्यामुळे हा एकाच प्रकारचा धोकादायक विषाणू मानला जात आहे. आता प्रश्न असा आहे की जर कोरोना व्हायरस आणि HMPV ची लक्षणे सारखी असतील तर कोरोना व्हायरससाठी बनवलेली लस HMPV ला लागू होऊ शकते का? असा पश्न नक्कीच पडतो. विषाणूशास्त्रज्ञांनी याबद्दल काय सांगितलं आहे ते जाणून घेऊयात.
HMPV इन्फेक्शनपासून करोनाची लस वाचवू शकते?
डॉ. आंबेडकर सेंटर फॉर बायोमेडिकल रिसर्च, नवी दिल्लीचे संचालक आणि वरिष्ठ व्हायरोलॉजिस्ट डॉ सुनीत कुमार सिंग यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की मानवी मेटापन्यूमोव्हायरस हा नवीन विषाणू नाही आणि त्याची लक्षणे इन्फ्लूएंझा व्हायरससारखी आहेत.
बहुतेक श्वसन संक्रमणांमध्ये, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत कफ, नाक वाहणे, ताप येणे यासारख्या समस्या उद्भवतात.कोरोना विषाणूची अनेक लक्षणे सारखीच आहेत आणि यामुळेच लोक HMPV आणि कोरोना विषाणूला समान मानत आहेत. तथापि, SARS-CoV-2 आणि मानवी मेटापन्यूमोव्हायरस वेगवेगळ्या कुटुंबातील विषाणू आहेत.
या दोन विषाणूंचे प्रतिजैविक स्वरूप देखील भिन्न आहे. या कारणास्तव कोरोनाव्हायरस लस HMPV विरूद्ध संरक्षणात्मक असू शकत नाही. असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
कोणतीही लस कशी तयार केली जाते?
डॉ.सुनीत सिंह यांनी सांगितले की, बहुतांश लसी कोणत्याही विषाणूच्या प्रथिनांपासून बनवल्या जातात आणि त्यांच्याविरुद्ध शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. सर्व विषाणूंची प्रथिने वेगवेगळी असतात, त्यामुळे एका विषाणूची लस दुसऱ्या विषाणूवर प्रभावी मानली जाऊ शकत नाही.
दोन्ही आजारांच्या लक्षणांमध्ये समानता असूनही, ती लस इतर विषाणूंपासून संरक्षण करणारी असू शकत नाही. सध्या मानवी मेटापन्यूमोव्हायरससाठी कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही.
चिंतेची बाब अशी आहे की एचएमपीव्ही हा RNA विषाणू आहे, जो खूप वेगाने उत्परिवर्तन करू शकतो. तसेच त्याची प्रकरणे वेगाने वाढू शकतात आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. असही म्हटलं जातं आहे.
HMPV एवढ्या वेगाने का पसरतोय?
विषाणूशास्त्रज्ञांच्या मते चीनमध्ये मानवी मेटापन्यूमोव्हायरसमुळे प्रकरणे खूप वेगाने वाढत आहेत, परंतु अद्याप कोणताही डेटा उपलब्ध नाही. जर चीनमध्ये पसरणाऱ्या व्हायरसचा जीनोम सिक्वेन्सिंग डेटा उपलब्ध असेल, तर चीन आणि भारतात पसरणाऱ्या एचएमपीव्हीमध्ये काय समानता आणि फरक आहेत हे शोधणे शक्य होईल.
चीनमध्ये या विषाणूची प्रकरणे इतक्या वेगाने का वाढत आहेत हे शोधण्यात जीनोम सिक्वेन्सिंग देखील मदत करू शकते. भारतातील लोकांनी घाबरण्याची गरज नसली तरी या विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोरोनासारख्या प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. त्यामुळे हा विषाणू रोखण्यास मदत होऊ शकते असही त्यांनी सांगितलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List