‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत गुरुमाच्या एण्ट्रीने खळबळ; ठाकूरांच्या घरी अचानक अवतरणारी ही व्यक्ती कोण?
झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत मोठा धमाका होणार आहे. मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध आणि जेष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची मालिकेत धमाकेदार एण्ट्री होणार आहे. त्या एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत आणि त्यांच्या भूमिकेचं नाव आहे 'गुरुमा'.
गुरुमाच्या एन्ट्रीने जयश्रीची ही तारांबळ उडणार आहे. गुरुमा एक आध्यात्मिक मार्गदर्शक आणि माधवची म्हणजेच आकाशच्या बाबांची बहीण आहे. कुटुंबात त्या मोठ्या सुनेची पारख करणार आहे.
जयश्री गुरुमाची सर्व जबाबदारी वसुंधरावर सोपवते. तिला आशा आहे की वसुंधरा अपयशी ठरेल. वसुंधरा गुरुमा यांना प्रभावित करते आणि त्यांचा आदर मिळवते. गुरुमाच्या शिष्यांचं आगमन होतं तेव्हा वसुंधरा त्यांची काळजीही घेते.
जयश्री आणि तनयाची कारस्थानं सुरूच आहेत. पण वसुंधराची प्रामाणिकता यात उजवी ठरते. तनया आणि वसुंधराने गुरुमासाठी तयार केलेलं जेवण दूषित करण्याचा प्रयत्न करते. पण वसुंधराच्या खरी माफी आणि चिकाटीमुळे गुरुमा तिच्यावर विश्वास ठेवतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List