आधी अभिनेत्याची नात बनली; मग वयाचं बंधन झुगारून त्याच अभिनेत्यासोबत रोमान्स
बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड या चित्रपटसृष्टीतील काही अभिनेते 90 च्या दशकांपासून आजपर्यंत हिरोचच काम करत आहे. ते चित्रपटात असताना त्यांच्यासोबत काम करणाऱ्या बऱ्याच अभिनेत्री तेव्हा शाळा-कॉलेजमध्ये शिकत होत्या. त्याच अभिनेत्री आज त्याच अभिनेत्यांसोबत चित्रपटात रोमान्स करताना दिसतात.
तसेच चित्रपटसृष्टींमध्ये भूमिका फार महत्त्वाची मानली जाते. जसं की असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी दुहेरी आणि तिहेरी भूमिका करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जसं, अनेक अभिनेत्रीने एका चित्रपटात ज्या अभिनेत्याची मुलगी, बहिण म्हणून काम केलं आहे. त्याचं अभिनेत्यासोबत दुसऱ्या चित्रपटांमध्ये रोमान्सही केला आहे.
दुहेरी भूमिकेसाठी अभिनेत्री ओळखली जाते
अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री होती जिची चर्चा अशाच दुहेरी भूमिकेसाठी झाली होती. या अभिनेत्रीने एका चित्रपटात ज्या अभिनेत्याच्या नातीची भूमिका साकारली होती त्याच अभिनेत्यासोबत दुसऱ्सा एका चित्रपटात त्याची नायिका म्हणून त्याच्यासोबत रोमान्सही केला आहे.
आधी नातीची भूमिका मग त्याच अभिनेत्यासोबत रोमान्स
ही अभिनेत्री म्हणजे लाखो दिल की धडकन राहिलेल्या श्रीदेवी. श्रीदेवी यांनी साउथ सुपरस्टारसोबतच्या चित्रपटात काम करताना त्यांच्या नातीची भूमिका साकारली होती तर त्या अभिनेत्याने आजोबांची भूमिका साकारली होती आणि नंतर ती त्याच अभिनेत्याची नायिका बनली होती.
साउथ सुपरस्टार अभिनेता म्हणजे दिवंगत टॉलीवूड स्टार एनटी रामाराव. वयाच्या 9 व्या वर्षी श्रीदेवीने 1972 च्या तेलुगू चित्रपट ‘बडी पंथुलु’मध्ये एनटी रामाराव यांच्या नातीची भूमिका केली होती. एनटी रामाराव या चित्रपटात 56 वर्षांच्या आजोबांच्या भूमिकेत दिसले होते. त्यांच्या वयातील फरक साधारण 40 वर्षांचा होता.
श्रीदेवी आणि एनटी रामाराव यांनी एकत्र 12 चित्रपट केले
त्यात ‘बडी पंथुलु’ चित्रपटाच्या 7 वर्षानंतर 1979 मध्ये आलेल्या तेलगू चित्रपट ‘वेतागडू’मध्ये श्रीदेवीने एनटी रामाराव यांच्यासोबत नायिकेची भूमिका साकारली होती. हा चित्रपट एक ॲक्शन थ्रिलर होता, ज्याचे दिग्दर्शन के राघवेंद्र राव यांनी केले. श्रीदेवी आणि एनटी रामाराव यांनी एकत्र 12 चित्रपट केले होते.
श्रीदेवीने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या करिअरमध्ये श्रीदेवीने अमिताभ बच्चन, जितेंद्र आणि ऋषी कपूर यांच्यासोबत अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
80s, 90s चा काळ अभिनेत्रीने गाजवला
1989 मध्ये आलेल्या चांदनी या चित्रपटात श्रीदेवीने ऋषी कपूरसोबत इतकी दमदार भूमिका साकारली की हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आजही लोकांना हा चित्रपट पाहायला आवडतो. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्रीही खूप आवडली होती.
श्रीदेवी आणि एनटी रामाराव यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का
एनटी रामाराव यांचे 1996 मध्ये 72 व्या वर्षी निधन झाले. तर श्रीदेवी यांचे 2018 मध्ये 54 व्या वर्षी निधन झाले. या दोघांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला. परंतु त्यांचे योगदान नक्कीच मोठे आहे. श्रीदेवी आणि एनटी रामाराव यांचे काम आणि चित्रपट अजूनही आपल्यात जिवंत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List