कितने दूर कितने पास… पलक-इब्राहिमची एकत्र पार्टी, एअरपोर्टवर मात्र आले वेगवेगळे…

कितने दूर कितने पास… पलक-इब्राहिमची एकत्र पार्टी, एअरपोर्टवर मात्र आले वेगवेगळे…

अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी हिचा बॉलिवूड डेब्यू होऊन बराच काळ लोटला आहे. तिचं नाव गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा,  इब्राहिम अली खान याच्याशी जोडलं जात आहे. ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचीही चर्चा सुरू आहे. मात्र ते कितंपत खरं हे माहीत नाही, पण असं असलं तरी ते बरेच वेळा एकमेकांसोबत स्पॉट झाले आहेत. पलककडे इब्राहिमचं जॅकेटही दिसलं होतं, काही मूव्ही डेट्स, पार्टीजमध्येही ते एकत्र दिसतात. पण त्या दोघांनीही अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही की मौन सोडलं नाही. याचदरम्यान पलक आणि इब्राहिम पुन्हा स्पॉट झाले, तेही मुंबई एअरपोर्टवर.

पलक आणि इब्राहिमचा व्हिडीओ व्हायरल

पलक तिवारी आणि इब्राहिम अली खानचा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झाला आहे. मुंबई विमानतळावर ते दोघे दिसले, मात्र वेगवेगळे. त्यावेळी पलक काळ्या रंगाचा टॉप आणि डेनिम जीन्स आणि गॉगल घालून होती. तर दुसरीकडे इब्राहिम अली खान हा मात्र त्याचा चेहरा लपवून मीडियाला टाळताना दिसला. विमानतळावर पलक आणि इब्राहिम एकाच वेळी दिसले. मात्र, दोघेही पापाराझीपासून अलगद सुटका करून निघण्याचा प्रयत्न करताना दिसले. पण मीडियाने, फोटोग्राफर्सनी अखेर त्यांना गाठलंच. रिपोर्ट्सनुसार, पलक आणि इब्राहिम दोघांनीही एकत्र नव वर्ष साजरं केलं, सुट्टी एकत्र घालवली आणि मग ते मुंबईला परतले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

या व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत. पतौडी कुटुंबाची सून,अस एका युजरने लिहीलं. तर पतौडी कुटुंबातील सुनेचे स्वागत आहे असं आणखी एकाने लिहीलं. या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजतंय असा संशय एकाने व्यक्त केला. पण आम्ही एकमेकांना डेट करत नाहीयोत, असंही हे आता म्हणतील अशी कमेंट आणखी एका यूजरने केली. त्यांची जोडी अनेकांना आवडताना दिसत्ये, आता हे त्याचं नात अधिकृतपमे मान्य करतात का याकडे अनेकांचं लक्ष आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Saif Ali Khan : अखेर तो सापडला; आरोपीचा फोटो समोर, मध्यरात्री सैफ अली खानवर केला होता चाकू हल्ला Saif Ali Khan : अखेर तो सापडला; आरोपीचा फोटो समोर, मध्यरात्री सैफ अली खानवर केला होता चाकू हल्ला
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री हल्ला झाला. चाकूने त्याच्यावर 6 वार करण्यात आले. त्यातील दोन वार हे अत्यंत...
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
‘अभयने आमचे फोन नंबर ब्लॉक केले…’, IIT बाबाच्या वडिलांचे भावूक उद्गार
जखमी सैफला मुलाने ऑटो रिक्षातून लीलावतीत नेले, हल्ल्यानंतर काय घडलं नेमकं?
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानची एन्ट्री, पाकच्या माजी मंत्र्यानं जोडला भारतातील या संघटनेशी हल्ल्याचा संबंध
सैफ अली खानवर हल्ला, बाबा सिद्दीकींची हत्या अन्…; वांद्रे परिसर हिट-लिस्टवर? मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
सैफ अली खानला चाकूने भोसकले… हल्ल्यानंतरचे 5 प्रश्न अन्… पोलीस तपासात काय काय घडतंय?