दीड वर्षानंतरही शिर्डीतून रात्रीची विमानसेवा नाहीच !
साईभक्तांच्या सोयीसाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळाच्या नाईट लैंडिंगचे काम पूर्ण होऊन दीड वर्ष उलटले आहे. तरीही अजूनही या विमानतळावरून रात्रीची विमानसेवा सुरू झालेली नाही. ८ एप्रिल २०२३ रोजी शिडर्डी विमानतळावरून नाईट लैंडिंगची चाचणी झाली होती. यावेळी दिल्लीवरून शिर्डीला २११ प्रवासी आले होते, तर शिर्डीवरून दिल्लीला २३२ प्रवासी गेले होते. यामुळे रात्रीची विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला होता; परंतु आजपर्यंतही या विमानतळावरून रात्रीची विमानसेवा सुरू झालेली नाही.
विमानतळावरुन नाईट लौंडंगचे काम पूर्ण झाल्याचे विमान कंपन्यांना कळविले आहे. विमान कंपन्यांनी तयारी दाखविल्यानंतर या विमानतळावरून नाईट लँडिंग सुरू होण्यास अडचण येणार नाही. विमान कंपन्यांनी ठरविल्यानंतर या ठिकाणाहून नाईट लैंडिंग सुरू होईल, असे प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी दीड वर्षांत एकाही विमान कंपनीने विमान उड्डाणाची तयारी दर्शविली नाही.
शिर्डी विमानतळ सुरू झाल्यापासून प्रवाशांच्या सर्वाधिक पसंतीला उतरलेले विमानतळ आहे. सध्या या विमानतळावरून १० विमाने येतात आणि १० विमाने जातात, अशा २७ फेऱ्या या विमानतळावरून सुरू आहेत. चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, विजयवाडा, दिल्ली व इंदूर याठिकाणी विमानसेवा सुरू आहेत. या ठिकाणावरून रात्रीची विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रवाशांची होती. विमानतळावरून गरज पडल्यास रात्री दहा वाजेपर्यंत विमानांची ये-जा होते. विमानतळाच्या धावपट्टीच्या पुनर्रचनेचे कामही अंतिम टप्प्यात आहे. मात्र, नाईट लैंडिंगची सुविधा या ठिकाणी नव्हती. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने नाईट लँडिंगसाठी आवश्यक असलेली सर्व कामे पूर्ण करत केंद्राकडे परवानगी मागितली होती. केंद्राच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने फेब्रुवारी २०२३ मध्ये नाईट लैंडिंगला परवानगी दिली. त्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये दिल्लीहून आलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाची रात्री लैंडिंगची यशस्वी चाचणी झाली आणि या विमानतळाच्या विस्ताराचे दालन खुले झाले होते.
सध्या नाईट लँडिंग सुरू झाल्यानंतर काकड आरतीला उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांना रात्री प्रवास करून येता येणार आहे. एकूणच भाविकांना मोठ्या सुविधा निर्माण होणार आहेत. रात्रीच्या विमानसेवेमुळे या परिसराच्या विकासाला गती मिळेल. रात्रीच्या लौंडंगमुळे शिर्डीत भाविकांच्या संख्येतही मोठी वाढ अपेक्षित असून, त्यामुळे स्थानिक अर्थकारणाला गती प्राप्त होईल. दिवसा काही कंपन्या सेवा सुरू करण्यास उत्सुक आहेत. रात्रीचे भाडे कमी असल्याने साईभक्तांना ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. मात्र, त्यासाठी विमान कंपन्यांची सकारात्मकता आवश्यक आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List