माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन
किनवट-माहूर तालुक्याचे माजी आमदार प्रदीप नाईक (69) यांचे हैदराबाद येथे पहाटे 5 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथील रहिवासी असलेल्या प्रदीप नाईक यांच्या निधनाची वार्ता येताच सर्वत्र शोककळा पसरली. नाईक यांच्यावर गुरूवार, 2 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता दहेली तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातू नातवंड असा परिवार आहे.
प्रदीप नाईक हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक. 1999 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला. 2004 च्या निवडणुकीत किनवटकरांनी त्यांना विजयी केले. सलग पंधरा वर्षे ते किनवटचे आमदार होते. 2024 च्या निवडणुकीत अल्प मतांनी त्यांचा पराभव झाला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List