तमन्ना भाटियाचा बॉयफ्रेंड अभिनेता विजय वर्मा या आजाराने ग्रस्त; घ्यावा लागतो मेकअपचा आधार

तमन्ना भाटियाचा बॉयफ्रेंड अभिनेता विजय वर्मा या आजाराने ग्रस्त; घ्यावा लागतो मेकअपचा आधार

बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत जे फार कमी वेळात नावारुपाला आले. स्वत:च्या हिंमतीवर या कलाकरांनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. असाच एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे विजय वर्मा. विजय वर्मा हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे. या अभिनेत्याने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. अनेक वेबसिरीजमध्येही काम केलं आहे. पण विजय वर्माची जास्त चर्चा झाली ती त्याच्या आणि तमन्ना भाटियाच्या नात्यामुळे.

मिर्झापूर, गली बॉईज, डार्लिंग यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाने सर्वांना थक्क करणारा अभिनेता विजय वर्माला आज परिचयाची गरज नाही. त्याने अनेक भूमिका केल्या आहेत.परंतु आता विजयची चर्चा होतेय ती एका आजाराचे निदान झाल्यामुळे.

अभिनेता विजय वर्मा कोणत्या आजाराने ग्रस्त

एका मुलाखतीत विजयने सांगितले की तो एका आजाराने ग्रस्त आहे. विजय वर्मा त्वचेच्या दुर्मिळ समस्येने त्रस्त आहे, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर पांढरे डाग दिसतात आणि ते लपवण्यासाठी मेकअपचा वापर करावा लागतो. असंही त्याने सांगितले.

नक्की विजयला कोणता आजार झाला आहे? या आजाराला नक्की काय म्हणतात आणि या आजाराची लक्षणे काय आहेत याबाबत आपण अधिक माहिती घेऊया.

विजय वर्माला कोणता आजार झालाय?

अलीकडेच एका वेब सीरिजच्या प्रमोशन दरम्यान, विजय वर्माने खुलासा केला की तो त्वचारोगाने ग्रस्त आहे ज्याचे नाव विटिलिगो आहे, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर पांढरे डाग दिसतात आणि ते लपवण्यासाठी त्याला मेकअपचा आधार घ्यावा लागतो. विटिलिगो हा इंग्रजी शब्द असून याला मराठीत कोड असंही म्हटलं जातं.

विटिलिगो त्वचारोग म्हणजेच पांढऱ्या डागांची समस्या आणि हा एक दुर्मिळ आजार आहे, ज्यामुळे शरीराच्या कोणत्याही भागात रंगद्रव्य निर्माण होऊन त्वचेचा मूळ रंग हरवतो आणि पांढरे ठिपके तयार होऊ लागतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, विटिलिगोमध्ये शरीरातील मेलेनिनचे उत्पादन कमी करणाऱ्या पेशी हळूहळू मरायला लागतात, त्यामुळे त्वचेवर पांढरे डाग दिसतात.

विटिलिगोची लक्षणे

त्वचेवर दुधाळ-पांढरे डाग तयार होणे
त्वचेचा रंग कमी होणे किंवा रंग उडून जाणे
त्वचेचा रंग खराब होत असलेल्या भागात केस असतील तर ते राखाडी होऊ शकतात वा त्याचा रंग बदलू शकतो
तुमच्या तोंडाच्या किंवा नाकाच्या आतील भागामध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो
डोळ्यातील पडदा अर्थात रेटिनाचा रंग फिका पडू लागतो

विटिलिगो न होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?

विटिलिगो त्वचारोगावर अद्याप कोणताही अचूक उपचार नाही, जे काही उपचार अस्तित्वात आहेत ते फक्त त्याचा प्रसार थांबवतात. विटिलिगोची सुरुवातीची लक्षणे दिसू लागल्यावर औषधे आणि क्रीम्सद्वारे तो बरा करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यासाठी लेझर थेरपीचाही वापर केला जातो.

याशिवाय, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात हा प्रसार पूर्णपणे थांबतो, तेव्हा नॅरो बँड थेरपी देखील दिली जाऊ शकते. याशिवाय एक्सायमर लेसरमधील यूव्हीबी प्रकाशाच्या माध्यमातून त्वचेतील मेलेनिनचे उत्पादन वाढवून मूळ रंग परत आणता येतो, त्यामुळे पांढरे डाग पसरण्यास प्रतिबंध करता येतो.

(डिस्क्लेमर: वरील माहिती ही उपलब्ध स्त्रोतांवरून दिलेली आहे. कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महायुतीचे नेते अन् कार्यकर्ते करणार गावागावात ‘डब्बा पार्टी’, कारण… महायुतीचे नेते अन् कार्यकर्ते करणार गावागावात ‘डब्बा पार्टी’, कारण…
PM Narendra Modi Mumbai Visit: विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीला 230 जागांवर यश मिळाले. त्यात भाजप सर्वात मोठा...
  टॅक्सी-ऑटो रिक्षा भाड्याचा टप्पा एक किलोमीटर करावा, भाडे वाढ करु नये, जनता दलाची मागणी
लाल साडी, हातात बांगड्या अन् सिंदुर; नवी नवरी शोभिताने कसा साजरा केला लग्नानंतरचा पहिला पोंगल? नेटकऱ्यांकडून कौतुक
दिल्लीतील भाजप उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
Video – धनंजय मुंडे वाल्मीक कराडच्या आई-पत्नीला भेटले?
Walmik Karad – बीड कोर्टाबाहेर राडा, कराड समर्थक आणि कराड विरोधकांची घोषणाबाजी
Video – संकटकाळात मदत करणाऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा कधी पाहिली नाही – राऊत