91 वर्षीय आशा भोसले ‘तौबा तौबा’वर थिरकल्या; हूक स्टेपने चाहत्यांना भुरळ घातली, सिग्नेचर डान्स स्टेप्सही केली
हिंदुस्थानच्या प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी ‘तौबा तौबा’ या गाण्यावर तरुणाई लाजवेल असे नृत्य करून सर्वांची मने जिंकली. नव्वदी पार केलेल्या आशा भोसले यांच्या हूक स्टेपने चाहत्यांना भुरळ घातली. दुबईतील एका कॉन्सर्टमध्ये त्यांनी विकी कौशलच्या ‘तौबा तौबा’ गाण्यावर अप्रतिम डान्स केला. हे नृत्य पाहून गाण्याचा गायक करण औजलाने भावनिक प्रतिक्रिया देत संगीत क्षेत्रातील देवी असलेल्या आशा भोसले यांनी एका छोटय़ा गावात वाढलेल्या मुलाने लिहिलेले गाणे गायले. त्यांनी दिलेले हे प्रेम कधीच विसरता येणार नाही, असे म्हटले.
आशा भोसले यांच्या परफॉर्मन्सला चाहत्यांनी दाद दिली. ’बॅड न्यूज’ चित्रपटातील तौबा तौबा हे गाणे त्यांनी केवळ गायलेच नाही तर अभिनेता विकी कौशलने केलेल्या सिग्नेचर डान्स स्टेप्सही केल्या. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दिग्गज गायिकेवर कौतुकाचा वर्षाव केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी आशा भोसले यांची भरभरून स्तुती केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List