संतोष देशमुखांना न्याय द्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; बीडनंतर आता बुलढाण्यात ‘काळा आक्रोश ‘,  हजारोंची उपस्थिती   

संतोष देशमुखांना न्याय द्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; बीडनंतर आता बुलढाण्यात ‘काळा आक्रोश ‘,  हजारोंची उपस्थिती   

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली, या घटनेला आता वीस दिवस उलटून गेले आहेत. मात्र या प्रकरणातील काही आरोपी पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेलं नाही. त्यामुळे वातावरण चांगलंचं तापलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक व्हावी या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीयाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर आता बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आहे.

हजारोंची गर्दी  

या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले आहेत. महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय आहे. आंदोलकांच्या हातात काळे झेंडे असून, हातामध्ये काळे बँड घातले आहेत. काही आंदोलकांच्या हातामध्ये संतोष देशमुख यांना न्याय द्या, सर्व आरोपींना अटक करा, असा मजकूर असलेले पोस्टर देखील आहेत. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आदोलकांमधून होत आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, आरोपींना फाशी द्या अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे.  या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील सहभागी झालं आहे.

दरम्यान या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख या देखील सहभागी झाल्या आहेत. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की स्फूर्ती घेण्यासाठी आम्ही सिंदखेड राजा येथे आलो आहोत. ज्या घटना झाल्या त्यांना न्याय मिळाला पाहिजे, मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा, वडिलांची प्रत्येक क्षणाला आठवण येते. तुमची साथ कायमस्वररुपी राहू द्या, मुख्यमंत्र्यंना विनंती करते की त्यांनी वडिलांना न्याय द्यावा. अशी शिक्षा द्या की पुन्हा असा गुन्हा कोणी केला नाही पाहिजे, अशी मागणी यावेळी वैभवी देशमुख यांनी केली आहे.

दरम्यान या मोर्चामध्ये राजेंद्र शिंगणे देखील सहभागी झाले आहेत.  हे प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, आरोपींना फाशी द्या. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिंगणे यांनी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List