शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ठाण्याचे पहिले महापौर अन् शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे निधन
Shivsena Leader Satish Pradhan Passed Away: शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ठाणे महानगरपालिकेचे शिवसेनेचे प्रथम महापौर माजी खासदार सतीश प्रधान (वय ८४) यांचे रविवारी दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोठे योगदान दिले. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे. सतीश प्रधान यांचा जन्म 29 ऑगस्ट 1940 रोजी झाला होता. ते ठाणे शहराचे पहिले महापौर होते. ते शिवसेनेचे होते आणि राज्यसभेतील शिवसेना पक्षाचे नेते होते.
ठाण्याचे पहिले महापौर
काही दिवसांपासून सतीश प्रधान यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उचचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. त्यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयाची १९८० साली स्थापन केले होती. माजी खासदार, ठाण्याचे पाहिले नगराध्यक्ष, पाहिले महापौर राहिले आहेत. ठाणे शहरात पहिली महापौर मॅरेथॉन सुरू केली. त्यांच्याकडे स्मार्ट सिटीची दूरदृष्टी होती.त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी मोठी हानी आहे.
बाबरी मशीद प्रकरणातून निर्दोष मुक्तता
बाबरी प्रकरणात सतीश प्रधान यांच्यावर आरोपपत्र दाखल होते. त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. त्यांनी कोर्टात म्हटले होते, “मी लालकृष्ण अडवाणी आणि मनोहज जोशी यांना जमावाला नियंत्रित करताना, त्यांना शांत करताना आणि पुढे जाण्यापासून रोखताना पाहिले होते. परंतु जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. जमावाच्या उद्रेकामुळे बाबरी मशीदची घटना घडली.”
काही दिवसांपूर्वी सतीश प्रधान यांची रुग्णालयामध्ये जाऊन शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट घेतली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List