मणिपूरमध्ये सुरक्षा दल आणि पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जप्त केली शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा
मणिपूरमध्ये अद्यापही परिस्थिती सामान्य झालेली नाही. दरम्यान, सुरक्षादल आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितलं की, 6 ते 11 जानेवारी दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या संयुक्त कारवाईत शस्त्रे, दारूगोळा आणि युद्धसामग्री जप्त करण्यात आली. ही कारवाई हिंदुस्थानी लष्कर, मणिपूर पोलीस, आसाम रायफल्स आणि इतर सुरक्षा दलांनी संयुक्तपणे केली.
थौबल, कांगपोक्पी, चर्चंदपूर आणि काकचिंग जिल्ह्यांमधून एकूण 19 शस्त्रे जप्त करण्यात आली.
जप्तीच्या नोंदीनुसार 11 जानेवारी रोजी आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांनी गुप्तचर यंत्रणेवर आधारित कारवाई सुरू केली, ज्यामध्ये एक पिस्तूल, चार सिंगल बॅरल रायफल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले.
थौबल आणि काकचिंग जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे 6 आणि 9 जानेवारी रोजी अशाच प्रकारच्या कारवाई करण्यात आल्या. या कारवाईत एक सेल्फ-लोडिंग रायफल, एक सिंगल बॅरल रायफल, एक इम्प्रोव्हायझ्ड मोर्टार, तीन पिस्तूल, ग्रेनेड आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांनी 9 जानेवारी रोजी जिरीबाम जिल्ह्यातून स्फोटके आणि अन्य शस्त्रे जप्त केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List