शिर्डी साई मंदिरात आता फुले अर्पण करता येणार
शिर्डी येथील साईबाबा मंदिरात आता हार आणि फुले अर्पण करता येणार आहेत. कोरोना काळापासून यावर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी आजपासून उठवण्यात आली. त्यानुसार हार, फुले आणि प्रसादासही परवानगी देण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतला आहे. दरम्यान, साईबाबांच्या संगमरवरी मूर्तीचे थ्रीडी स्कॅनिंग करून डेटा संरक्षित केला जाणार आहे. त्यासाठी तज्ञ समितीचे सदस्य 20 डिसेंबर रोजी मंदिराला भेट देणार असून त्यादिवशी दुपारी 1.45 ते 4.30 या वेळेत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले जाणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List