Delhi Elections 2025: ‘आप’ची चौथी यादी जाहीर, जाणून घ्या अरविंद केजरीवाल कुठून लढणार निवडणूक?
आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 साठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत 38 उमेदवारांची नावे आहेत. यात आप अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्याही नावाचा समावेश आहे. अरविंद केजरीवाल हे नवी दिल्लीतून तर आतिशी या कालकाजीतून निवडणूक लढवणार आहेत.
याआधी पक्षाने 3 याद्या जाहीर केल्या आहेत. यावेळी पक्षाने कोणत्याही पक्षासोबत युती न करण्याचा निर्णय घेतला. पक्ष एकट्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून सर्व 70 विधानसभा जागांवर उमेदवार उभे करत आहे.
2 दिवसांपूर्वी तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती
आम आदमी पक्षाने (AAP) दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 13 डिसेंबर 2025 रोजी तिसरी यादी जाहीर केली होती. यामध्ये नजफगड विधानसभा मतदारसंघातून तरुण यादव हे फक्त एका उमेदवाराचे नाव होते.
https://x.com/ANI/status/1868204164125487591?t=7pI1mTpsuCGXnIIn75BhrA&s=19
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List