साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 15 डिसेंबर ते शनिवार 21 डिसेंबर 2024
>> नीलिमा प्रधान
मेष – प्रत्येक दिवस नव्या विचारांचा
मेषेच्या भाग्येषात सूर्य, शुक्र गुरू त्रिकोणयोग. रागाच्या भरात चुकीचे शब्द वापराल. सावध रहा. प्रत्येक दिवस नव्या विचारांचा, भेटीचा ठरेल. नोकरीत प्रभाव वाढेल. धंद्यात चर्चा जपून करा. लाभ, वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील संघर्ष कमी होईल. तुमच्या जिद्दी, प्रयत्नवादी वृत्तीमुळे तुम्ही अग्रेसर राहाल.
शुभ दि. 15, 16
वृषभ – सौम्य धोरण ठेवा
वृषभेच्या अष्टमेषात सूर्य, चंद्र बुध त्रिकोणयोग. अहंकाराने वरिष्ठांशी वागू नका. मधुरवाणी व कार्यतत्परता दाखवा. नोकरीत सौम्य धोरण ठेवा. धंद्यात वाढ, लाभ होईल. घरगुती कामे वाढतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात क्षुल्लक तणाव वाढवू नका. समस्या मोठी करू नका. योग्य मुद्दा नम्रपणे मांडा. वरिष्ठांचा दबाव राहील.
शुभ दि. 16, 17
मिथुन – धंद्यात फसगत टाळा
मिथुनेच्या सप्तमेषात सूर्य, चंद्र, शनि त्रिकोणयोग. मनाप्रमाणे घटना घडतील. कायद्याला धरून कोणतेही वक्तव्य करा. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. नवीन परिचय मनस्ताप देणारा ठरेल. नोकरीतील तणाव दूर कराल. धंद्यात फसगत टाळता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ तुमचे ऐकून येतील.
शुभ दि. 16, 17
कर्क – अहंकार नको
कर्केच्या षष्ठेशात सूर्य, चंद्र शुक्र प्रतियुती. अहंकार न ठेवता प्रेमाने वागा. तुमची कामे करून घेता येतील. क्षुल्लक गोष्टीवर मान-अपमानाचा विचार संताप वाढवणारा असेल. नोकरीत वरिष्ठांना मदत कराव लागेल. धंद्यात स्मितहास्य फायदेशीर ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निरीक्षण करा. वरिष्ठांच्या समोर बोलताना सावध रहा.
शुभ दि. 20, 21
सिंह – नोकरीत कामे वाढतील
सिंहेच्या पंचमेषात सूर्य, चंद्र मंगळ युती. काही निर्णय मुलांच्या कलाने घ्यावे लागतील. संतापजनक प्रतिक्रिया टाळा. खाण्याची काळजी घ्या. दुखापत टाळा. नोकरीत कामे वाढतील. स्पर्धा वाढेल. धंद्यात हिशेब नीट करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. जनतेशी समरस होताना नम्र रहा. समोरच्या व्यक्तीचा विचार करा.
शुभ दि. 15, 16
कन्या – संयम व स्नेहाने वागा
कन्येच्या सुखस्थानात सूर्य, शुक्र गुरू त्रिकोणयोग. महत्त्वाची कामे, भेट, चर्चा सप्ताहाच्या सुरूवातीलाच करा. तुमच्या बुद्धिचातुर्याचे कौतुक होईल. नोकरीधंद्यात नम्रता ठेवा. धंद्यात वाढ करणारी चर्चा करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक मैत्रीची भाषा करतील. संयम व स्नेहाची वागणूक यश मिळवून देईल.
शुभ दि. 16, 17
तूळ – अडचणी कमी होतील
तुळेच्या पराक्रमात सूर्य, चंद्र मंगळ युती. महत्त्वाची कामे होतील. आर्थिक व्यवहारातील अडचणी कमी होतील. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. नोकरीधंद्यात लाभ, वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तींची ओळख होईल. ज्ञानात भर पडेल. मानसन्मान मिळेल. नवीन जबाबदारी दिली जाईल. घरातील कामे करून घ्या.
शुभ दि. 16, 18
वृश्चिक – ध्येय गाठता येईल
वृश्चिकेच्या धनेषात सूर्य, शुक्र गुरू त्रिकोणयोग. तुमच्या कार्याला गती मिळेल. परिचय लाभदायक ठरेल. नोकरीधंद्यात प्रगतीकडे वाटचाल होईल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांना गोड बोलून शह देऊन स्वतचे ध्येय गाठता येईल. प्रतिष्ठा वाढेल. कौतुकाची थाप मिळेल.
शुभ दि. 18, 20
धनु – रागावर नियंत्रण ठेवा
स्वराशीत सूर्य, चंद्र शुक्र प्रतियुती. सर्वच ठिकाणी दिलासा देणारी परिस्थिती राहील. रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासात काळजी घ्या. दुखापत टाळा. नोकरीत काम वाढले तरी वर्चस्व राहील. धंद्यात कडवट बोलणे टाळा. पैसा जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायद्याला धरूनच मुद्दे मांडा. गुप्त कारवायांवर नजर ठेवा.
शुभ दि. 20, 21
मकर – वरिष्ठांची मर्जी राखा
मकरेच्या व्ययेषात सूर्य, शुक्र गुरू त्रिकोणयोग. तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जाईल. बोलण्यात गोडवा ठेवा. रागाने नुकसान होईल. नोकरीत दगदग होईल. वरिष्ठांची मर्जी राखा. धंद्यात अरेरावी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काही व्यक्ती टीकात्मक चर्चा करतील. स्वतच्या कार्यावर भर द्या. लोकप्रियता टिकवा.
शुभ दि. 18, 19
कुंभ – अनाठायी खर्च टाळा
कुंभेच्या एकादशात सूर्य, चंद्र बुध त्रिकोणयोग. जवळच्या व्यक्तींच्या भावना व विचार समजून घ्या. गैरसमज टाळा. अनाठायी खर्च टाळा. नोकरीत सहकारी, मित्र गैरफायदा घेतील. धंद्यात मोह नको. लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक कामांची गर्दी होईल. महत्त्वाचे काम करण्याची संधी मिळेल.
शुभ दि. 15, 16
मीन – नोकरीत वर्चस्व वाढेल
मीनेच्या दशमेषात सूर्य, शुक्र गुरू त्रिकोणयोग. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. नोकरीत वर्चस्व वाढेल. धंद्यातील धोरण योग्य राहील. कठीण कामे करून घ्या. गुंतवणूक योग्य करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संधी मिळेल. वरिष्ठ तुमचे विचार ऐकून घेतील. अधिकार लाभतील. योजनांसाठी प्रयत्न करा. लोकप्रियता वाढेल.
शुभ दि. 17, 18
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List