लंडन ते न्यूयॉर्क प्रवास अवघ्या 54 मिनिटांत, अमेरिका-इंग्लंडमधील 4 हजार 828 लांबीचा बोगदा
अमेरिका आणि इंग्लंड या दोन देशांत होणाऱ्या ट्रेन टनल योजनेची सध्या जगभर चर्चा सुरू झाली आहे. न्यूयॉर्क आणि लंडन या दोन शहरांना जोडणारी एक ट्रान्स अटलांटिक टनल योजना प्रस्तावित आहे. या दोन देशांत जाण्यासाठी विमान प्रवास केल्यास 8 तास लागतात, परंतु ट्रान्सअटलांटिक टनल योजना पूर्ण झाल्यास हा 8 तासांचा प्रवास अवघ्या तासाभरात शक्य होणार आहे. हे अंतर थोडे नसून तब्बल 4 हजार 828 किलोमीटर लांबीचे आहे. या योजनेसाठी तब्बल 19 ट्रिलियन डॉलरचा निधी लागणार आहे. त्यामुळे इतका मोठा निधी उभारणे शक्य होईल का? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. न्यूयॉर्क ते लंडन टनल निर्मितीसाठी 19.8 ट्रिलियन डॉलर खर्च अपेक्षित आहे. फ्रान्स आणि इंग्लंड यांना जोडणाऱया 37.8 किमीचा टनलच्या निर्मितीसाठी 6 वर्षांचा कालावधी लागला होता. मात्र लंडन ते न्यूयॉर्क टनल निर्मितीसाठी अधिक वेळ आणि अधिक पैसा लागेल. हा प्रकल्प पर्यावरण अनुकूल असणार आहे. यामुळे हवाई प्रवासामुळे होणाऱया वायू प्रदूषणात कपात होईल. या टनलमध्ये रेल्वेसाठी हवेचा विरोध असणार नाही. ज्यामुळे त्यांचा वेग 4 हजार 828 किमी प्रतितास इतका असेल.
सुपरलूप रेल्वेसारखी टेक्नोलॉजी
या योजनेसाठी सुपरलूप रेल्वेसारख्या टेक्नोलॉजीचा वापर होणार आहे. याची चाचणी स्वीसमधील इंजिनीअर्सकडून करण्यात आल्याचा दावासुद्धा करण्यात आला. काही वर्षांपासून हायपरलूप ट्रेन विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्याला अद्याप यश मिळाले नाही. यात व्हॅक्यूम स्टिस्टम, कॅप्सूल प्रोपल्शन सिस्टम, स्केलेबिलिटी, सुरक्षा आणि यासाठी लागणारा खर्च कमी ठेवण्याचे आव्हान आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List