तर राज्य सरकारला ‘अर्थ’ राहणार नाही, अर्थमंत्रिपदासाठी अजित पवार गटाचा आग्रह
अजित पवार गटाने अर्थमंत्रिपदासाठी आग्रह धरला आहे. जर अजित पवार यांना अर्थमंत्रिपद मिळाले नाही तर या सरकारला अर्थ राहणार नाही असे विधान अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी केले आहे.
अकोल्यात एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, अर्थमंत्रिपद हे अजित पवार गटाला मिळाले पाहिजे. अजित पवार अर्थमंत्री नाही झाले तर या सरकारलाच अर्थ राहणार नाही असे मिटकरी म्हणाले.
अजित पवार शरद पवार यांची भेट
दिल्लीत अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावर मिटकरी म्हणाले की ही कौटुंबिक भेट होती. 12 डिसेंबरला शरद पवार आणि 13 डिसेंबरला प्रतिभाताई पवार यांचा वाढदिवस असतो. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार यांनी दिल्लीत त्यांची भेट घेतली. यात कुठलाही राजकीय अन्वयार्थ काढण्याची गरज नाही असेही मिटकरी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List