लोकशाहीचा गळा घोटणारी ईव्हीएम हद्दपार करा! ‘ईव्हीएम गो बॅक’ सांगलीत स्वाक्षरी मोहीम

लोकशाहीचा गळा घोटणारी ईव्हीएम हद्दपार करा! ‘ईव्हीएम गो बॅक’ सांगलीत स्वाक्षरी मोहीम

नागरिकांच्या समस्या सोडवणारे, त्यांच्या विकासाच्या योजना राबविणारे राज्यकर्ते निवडून देण्यासाठी संविधानाने जनतेला मताचा हक्क दिला आहे. दुर्दैवाने ईव्हीएम मशीनवर बटण दाबून दिलेले मत ज्याला दिले त्याऐवजी दुसऱ्याच उमेदवाराला जाते. मशीन हॅक करून मतदारांच्या मतांची चोरी केली जाते. स्वातंत्र्य व लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या ईव्हीएमला हद्दपार करून सर्व निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात, अशी मागणी पृथ्वीराज पाटील यांनी केली. सांगली काँग्रेसने ‘ईव्हीएम मशीन गो बँक’ स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ झाला, त्यावेळी पृथ्वीराज पाटील बोलत होते.

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून ‘ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव’ मोहिमेंतर्गत लाखो सह्यांचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त यांना देण्यात येणार आहे. राज्यभरातून 5 लाख सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. त्यासाठी देशभर ‘ईव्हीएम गो बॅक’ स्वाक्षरी मोहीम काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे. आज सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मित्रमंडळ चौक मेनरोड सांगली येथे ‘ईव्हीएम गो बॅक’ स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.

पृथ्वीराज म्हणाले, ‘महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेत मोठे यश प्राप्त झाले असताना आणि विधानसभेला कोणतीही लाट नसताना झालेला पराभव अनाकलनीय, अविश्वसनीय व धक्कादायक आहे. लोकसभेच्या उलटे निकाल कसे काय लागू शकतात. 20 नोव्हेंबर आणि 21 नोव्हेंबर रोजी जाहीर मतांमध्ये 76 लाख मतांची वाढ झाली कशी, असा प्रश्न सर्व राजकीय नेते, कार्यकर्ते, पक्ष आणि सर्वसामान्य जनतेला पडला आहे. ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, असे जगातील अनेक वैज्ञानिकांचे मत आहे. अमेरिका, इंग्लड, फ्रान्स, जर्मनी व इतर अनेक देशांत मतपत्रिकेवरच मतदान घेतले जाते. यापूर्वी भारतात मतपत्रिकेवरच मतदान होत होते. आताही ते शक्य आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीन्स हटवून मतपत्रिकेवरच सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत, अशी महाविकास आघाडीसह तमाम जनतेची मागणी आहे.

यावेळी बिपीन कदम, गोपाळ पाटील, रामभाऊ पाटील, प्रा. एन. डी. बिरनाळे, आनंदराव पाटील, मयूर पाटील, तौफिक शिकलगार, मंगेश चव्हाण, विजय आवळे, इलाही बारुदवाले, सागर मुळे, शीतल सदलगे, मौला वंटमुरे, श्रीकांत साठे, महावीर पाटील, सनी धोतरे, दादा शिंदे, शहानवाज फकीर, गौस नदाफ, रमेश पाटील, योगेश राणे, प्रशांत माने, इसाक मुल्ला, रवींद्र वळवडे, अजिज मेस्त्री, तानाजी रुईकर, प्रसाद गवळी, किरण देवकुळे, विनायक साळसकर, याकूब मणेर, राजेंद्र कांबळे, संतोष भोसले, डॉ. विक्रम कोळेकर, डॉ. नामदेव कस्तुरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

सांगलीत आम्ही आज ‘ईव्हीएम गो बँक’ स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. सांगलीकरांनी लोकशाही व स्वातंत्र्य वाचवण्याच्या या मोहिमेचे जोरदार स्वागत केले आहे. स्वाक्षरीसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात व्यापक स्वरूपातही सह्यांची मोहीम राबवून सह्यांचे निवेदन प्रदेश कमेटीकडे तातडीने सादर करण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

31 डिसेंबरला शिर्डी साई मंदिर रात्रभर खुले 31 डिसेंबरला शिर्डी साई मंदिर रात्रभर खुले
नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरला शिर्डीतील साईबाबांचे मंदिर रात्रभर उघडे ठेववण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. देशातील कोट्य़वधी भक्तांचे श्रद्धास्थान...
श्री विठ्ठल मंदिरातील पितळी दरवाजाला चांदीची झळाळी
राज्यातील मंदिरांमध्ये आठवडय़ातून एकदा होणार महाआरती; शिर्डीतील मंदिर न्याय परिषदेत ठराव
खंडाळ्यात खोळंबा; नाताळच्या सुट्टीचे ‘बारा’ वाजले
हिंगोली हादरले – एसआरपी जवानाचा कुटुंबावर बेछूट गोळीबार, पत्नीचा मृत्यू, चिमुकल्यासह दोघे गंभीर; आरोपी फरार
झेलेन्स्की म्हणाले, याहून अमानवी काहीच असू शकत नाही; ख्रिसमसच्या दिवशी रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला
‘इस्रो’ची धमाकेदार वर्षअखेर, स्पॅडेक्स 30 डिसेंबरला लाँच होणार